Bigg Boss Marathi- वाईल्ड कार्ड स्पर्धक शर्मिष्ठा राऊत बिग बॉसच्या घरामधून बाहेर

Bigg Boss Marathi- वाईल्ड कार्ड स्पर्धक शर्मिष्ठा राऊत बिग बॉसच्या घरामधून बाहेर

जवळपास १०० दिवसांच्या प्रवासानंतर अखेर बिग बॉस मराठीचा पहिला विजेता कोण असणार हे कळणार आहे.

  • Share this:

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाच्या ग्रॅण्ड फिनालेला सुरूवात व्हायला आता अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. पहिल्या दिवसापासून हा शो अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला होता. स्पर्धकांमध्ये असलेली मैत्री, ईर्ष्या याच्या नव्या संकल्पना पाहायला मिळाल्या. पण आता हा शो अखेरच्या टप्प्यात आलाय. ग्रॅण्ड फिनालेमध्ये नेमकी काय घडेल याचीच झलक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  आस्ताद, सई, मेघा, पुष्कर, शर्मिष्ठा आणि स्मिता या सहा स्पर्धकांमधून शर्मिष्ठा राऊत शोमधून बाहेर पडली आहे. आता फक्त पाचजणांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. हळूहळू सोहळ्यात रंगत चढत चालली असून नक्की कोण विजेता होणार याची उत्सुकता शिगेला पोहचत आहे. जवळपास १०० दिवसांच्या प्रवासानंतर अखेर बिग बॉस मराठीचा पहिला विजेता कोण असणार हे कळणार आहे.

अंतिम फेरीत पोहोचलेल्या स्पर्धकांचे एकाहून एक सरस डान्स परफॉर्मन्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. शिवाय बाद झालेले स्पर्धकही ग्रॅण्ड फिनालेमध्ये त्यांचा जलवा दाखवणार आहेत. एकीकडे स्मिता आणि आस्ताद मराठमोळ्या गाण्यावर ठेका धरताना दिसतील तर, मेघा आणि शर्मिष्ठा बॉलिवूडच्या पिंगा गाण्यावर ताल धरणार आहेत. या सगळ्यांपेक्षा हटके असा डान्स परफॉर्मन्स सई आणि पुष्करचा असणार आहे. सई आणि पुष्कर चांद तू नभातला या रोमॅण्टिक गाण्यावर ठेका धरणार आहेत.  अंतिम फेरीत पोहोचलेल्या सर्व स्पर्धकांचा एकत्र डान्सही प्रेक्षकांना पाहता येणार आहे. आस्ताद, सई, मेघा, पुष्कर, शर्मिष्ठा आणि स्मिता हे सर्वजण एकत्र येऊन आज की रात या हिंदी गाण्यावर ठेका धरणार आहेत.

हेही वाचाः

Bigg Boss Marathi: मेघा धाडेच्या पतीने व्यक्त केले, 'बिग बॉस मराठी'बद्दलचे आपले मत

महिला स्पर्धक जिंकणार का 'बिग बॉस' फिनाले?

First published: July 22, 2018, 8:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading