Bigg Boss Marathi- आस्ताद काळे टॉप ५ मधून बाहेर...

Bigg Boss Marathi- आस्ताद काळे टॉप ५ मधून बाहेर...

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाच्या ग्रॅण्ड फिनालेला धडाक्यात सुरूवात झाली

  • Share this:

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाच्या ग्रॅण्ड फिनालेला धडाक्यात सुरूवात झाली. अंतिम फेरीतील स्पर्धक आणि बाहेर पडलेल्या स्पर्धकांच्या डान्स परफॉर्मन्स प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत. पहिल्या दिवसापासून हा शो अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला होता. स्पर्धकांमध्ये असलेली मैत्री, ईर्ष्या याच्या नव्या संकल्पना पाहायला मिळाल्या. पण आता हा शो अखेरच्या टप्प्यात आलाय. काही वेळापूर्वी वाईल्ड कार्ड एण्ट्री घेऊन बिग बॉसच्या घरात आलेली शर्मिष्ठा राऊत घरातून एलिमिनेट झाली होती. आता टॉप ५ मधून अभिनेता आस्ताद काळेही बाहेर पडला आहे. त्यामुळे सई, मेघा, पुष्कर आणि स्मिता यांच्यात बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाच्या विजेते पदासाठी चुरशीची लढत होणार आहे.  १५ एप्रिल रोजी सुूरू झालेला बिग बॉस मराठीचा खेळ अनेक कारणांनी गाजला. बिग बॉसच्या घरात जवळपास १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. दररोज नवीन वाद, नवीन टास्क, टास्कदरम्यान सेलिब्रिटींनी एकमेकांवर केलेली कुरघोडी यांनी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. पण गेल्या आठवड्यापासून बिग बॉस मराठीचा पहिला विजेता कोण ठरणार याविषयी सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. पण आता या शर्यतीतून आस्ताद बाहेर पडल्यामुळे त्याच्या चाहत्यांची निराशा झाली असेल हे मात्र नक्की.

हेही वाचाः

Bigg Boss Marathi: मेघा धाडेच्या पतीने व्यक्त केले, 'बिग बॉस मराठी'बद्दलचे आपले मत

महिला स्पर्धक जिंकणार का 'बिग बॉस' फिनाले?

Bigg Boss Marathi- वाईल्ड कार्ड स्पर्धक शर्मिष्ठा राऊत बिग बॉसच्या घरामधून बाहेर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 22, 2018 08:58 PM IST

ताज्या बातम्या