मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Video : 'Bigg Boss Marathi' च्या या स्पर्धकासाठी चक्क विदेशातून Vote Appeal!

Video : 'Bigg Boss Marathi' च्या या स्पर्धकासाठी चक्क विदेशातून Vote Appeal!

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या (bigg boss marathi 3 ) सीजनला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शोचा फिनाले आता काही दिवसावर आला आहे. प्रत्येक जण आपला आवडता स्पर्धक जिंकावा म्हणून प्रयत्न करत आहे.

  • Published by:  News18 Trending Desk
मुंबई, 22 डिसेंबर- बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या (bigg boss marathi 3 ) सीजनला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शोचा फिनाले आता काही दिवसावर आला आहे. प्रत्येक जण आपला आवडता स्पर्धक जिंकावा म्हणून प्रयत्न करत आहे. असाच एक बिग बॉस मराठीच्या पर्वातील अष्टपैलू खेळाडू उत्कर्ष शिंदे (utkarsh shinde votoe appeal)   याला जिंकण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केवळ महाराष्ट्रातून, देशातून नाहीतर परदेशातून देखील केले जात आहे. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये काही परदेशी नागरिक डॉक्टरला मतदान करा असे म्हणताना दिसत आहे. हा व्हिडिओ व काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. टीआरपी मराठीने त्यांच्या इन्स्टावर उत्कर्ष शिंदेचा हा व्हिडिओ व फोटो शेअर केले आहेत. यामध्ये काही नागरिक उत्कर्ष शिंदेला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. त्यांच्या हातात देखील त्याच्या नावाच्या पाट्या दिसत आहेत. घराबाहेर सर्वजण आपल्या आवडत्या स्पर्धकाला मतदान करण्याची अपील करत आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळीने देखील विकास पाटील याला मतदान करण्याचे अपील केले आहे. आता येणारा काळच ठरवेल की बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार. वाचा-पुरस्कार सोहळ्यात दिलेल्या वागणुकीमुळे शक्तिमान फेम वैष्णवी महन्त नाराज काल बिग बॉस मराठीच्या भागात उत्कर्षच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेण्यात आला आहे. त्याने सर्वच टास्कमध्ये खूप चांगली कामगिरी करून दाखवली असल्याने, त्याचा हा सत्कार सोहळा साजरा करण्यात आला. त्याच्याप्रमाणे काल विशाल निकम, मिनल शाह यांचा देखील असाच सत्कार सोहळा साजरा करण्यात आला. यामध्ये त्यांच्या आजवरचा प्रवास दाखवण्यात आला.
View this post on Instagram

A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

‘बिग बॉस मराठीच्या इतिहासात अष्टपैलू खेळाडू एकच आहे आणि तो म्हणजे उत्कर्ष शिंदे.’ असे म्हणत बिग बॉसच्या घरात बिग बॉसनेच उत्कर्षचे अभिनंदन केले आहे. ‘जब तक बिका न था तो कोई पुछता न था, आपने खरीदके अनमोल कर दिया.’ असे म्हणत भावनिक होऊन उत्कर्षणे बिग बॉसचे आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत.
First published:

Tags: Bigg boss marathi, Colors marathi, Entertainment, Marathi entertainment

पुढील बातम्या