'हुकुमशहा' नंदकिशोरच्या विरोधात बंड, मेघाला होणार शिक्षा

'हुकुमशहा' नंदकिशोरच्या विरोधात बंड, मेघाला होणार शिक्षा

बिग बॉसनी हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी हुकुमशहासमोर बंड करण्यासाठी प्रजेला काही टास्क दिलेत.

  • Share this:

मुंबई, 21 जून : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मंगळवारी प्रक्षेपित झालेल्या भागात हुकुमशहा झालेल्या नंदकिशोर चौगुलेमुळे मोठा वादंग निर्माण झालाय. द ग्रेट डिक्टेटर हे काम सुरू आहे. स्मिता आणि आस्ताद हुकुमशहा नंद किशोर यांचे रक्षक आहेत.त्यामुळे बराच वादंग निर्माण झाला. नंदकिशोरच्या वागण्यावर सगळीकडेच टीका सुरू आहे. पण आता ही परिस्थिती बदलतेय. त्यामुळे आता चांगलीच रंगत येणार आहे.

काल मेघाला बिग बॉसकडून मिळालेल्या आदेशानुसार आज प्रजा हुकूमशहा विरोधात बंड पुकारणार आहेत. बिग बॉसनी हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी हुकुमशहासमोर बंड करण्यासाठी प्रजेला काही टास्क दिलेत. यात हुकुमशहाच्या किमान पाच पोस्टरवर काळा रंग फासणे, हुकुमशहा यांचा पुतळा नष्ट करणे, हुकुमशहा यांच्या डोक्यावर पाणी ओतणे, हुकुमशहा यांच्यां विशेष रूम मध्ये जाऊन स्मोक बॉम्ब फोडणे या गोष्टी करणे अपेक्षित आहे.

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नंदकिशोर म्हणजेच हुकुमशहाचे घरामध्ये लागलेल्या पोस्टरवर काळा रंग फासताना आस्ताद मेघाला पकडणार आहे. तसेच मेघाकडे असलेली शाई देखील हुकुमशहाचे रक्षक जप्त करणार आहेत. त्यामुळे आता हा टास्क कसा पूर्ण होईल ? बिग बाॅसच्या घरातलं हे बंड किती रंजक होतंय ते पाहायचं.

हेही वाचा

बिग बाॅसच्या घरात 'हुकुमशहा' नंदकिशोर असा का वागला ?

या फिट सेलिब्रिटींचा हा आहे फिटनेस फंडा 

First published: June 21, 2018, 4:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading