मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Neha Shitole: बिग बॉसची धाकड गर्ल आता झालीये गीतकार, 'या' सिनेमासाठी लिहीलं गाणं

Neha Shitole: बिग बॉसची धाकड गर्ल आता झालीये गीतकार, 'या' सिनेमासाठी लिहीलं गाणं

नेहा शितोळे येत्या काळात अभिनयासोबत गीतलेख करताना दिसणार आहे. तिने एका नामांकित सिनेमामध्ये गीत लेखन केल्याचं समोर येत आहे.

नेहा शितोळे येत्या काळात अभिनयासोबत गीतलेख करताना दिसणार आहे. तिने एका नामांकित सिनेमामध्ये गीत लेखन केल्याचं समोर येत आहे.

नेहा शितोळे येत्या काळात अभिनयासोबत गीतलेख करताना दिसणार आहे. तिने एका नामांकित सिनेमामध्ये गीत लेखन केल्याचं समोर येत आहे.

मुंबई 19 जुलै: बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात धाकड गर्ल म्हणून ओळख मिळवलेली अभिनेत्री नेहा शितोळे सध्या अनेक कारणांनी बरेच चर्चेत येत असते. नेहाने नुकतीच एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये ती एका नव्या भूमिकेत समोर येणार असल्याचं कळत आहे. नेहा आजपर्यंत वेगवेगळ्या भूमिका लीलया पेलताना दिसून आली आहे. पण (neha shitole lyricist for de dhakka 2 movie) नेहाने यावेळी काहीतरी वेगळा प्रयत्न करायचा चंग बांधल्याचं समजत आहे. नेहा येत्या काळात गीतकाराच्या भूमिकेत दिसून येणार असून महेश मांजरेकरांच्या ‘दे धक्का 2’ सिनेमासाठी तिने एक गीत लिहिल्याचं समोर येत आहे. तिने लिहिलेल्या गीताचं नाव ‘देह फुटु दे’ असं असून हे अनोखं गाणं उद्या सगळ्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समोर येत आहे. सिनेमामधील या गाण्याचं एक पोस्टर तिने सोशल मीडियावर शेअर केलं आहे. तिचा हा आगळा वेगळा प्रयत्न तिच्यासाठी फारच स्पेशल असल्याचं तिने शेअर केलेल्या नव्या पोस्टमधून समोर येत आहे. या पोस्टमध्ये ती लिहिते, “खूप मनापासून केलेला एक नवीन प्रयत्न रसिक मायबापा चरणी अर्पण... उद्या @maheshmanjrekar दिग्दर्शित "दे धक्का २" ह्या सिनेमासाठी मी लिहिलेलं आणि @hiteshmodak ह्यांनी संगीतबद्ध केलेलं एक कमाल गाणं तुमच्या हवाली करतो आहोत... ऐका... सांगा कसं वाटतंय... आवडलं आणि नाही आवडलं तरी आपला अभिप्राय नक्की कळवा... Thank you @maheshmanjrekar and @hiteshmodak ह्या नवीन प्रवासावर निघण्यासाठी चा उत्साह आणि आवश्यक ते पाठबळ देण्यासाठी... I owe this journey to you... #dedhakka2 #❤️ #dehpetude”
View this post on Instagram

A post shared by NEHA SHITOLE (@nehanachiket)

पोस्टरवरून तरी गाणं मराठी संस्कृतीशी जवळीक साधणारं आणि अनोखं नातं सांगणारं असणार आहे अशी शंका व्यक्त केली जात आहे. नेहाच्या या दमदार प्रयत्नाचं बरंच कौतुक होताना दिसत आहे. नेहाच्या या प्रयत्नाला शुभेच्छा देत अनेकांनी तिला प्रोत्साहन दिल्याचं कमेंट्समध्ये पाहायला मिळत आहे. हे ही वाचा- Pushpa 2: पुष्पाच्या दुसऱ्या भागात होणार फॅमिली मॅनची एंट्री; हा अभिनेता दिसणार अल्लू अर्जुनसोबत नेहा सध्या बरीच चर्चेत येत असते. नेहाच्या एका चाहतीने तिला एक स्पेशल भेट दिल्याचं सुद्धा तिने मागच्या काळात शेअर केलं होतं. तिच्या चाहतीने नेहाचं एक सुंदर पोर्ट्रेट तिला भेट म्हणून दिल्याचं तिने शेअर केलं होतं.
First published:

Tags: Bigg boss marathi, Marathi actress

पुढील बातम्या