मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss च्या घरात राडा घालणारा आदिश वैद्य नक्की आहे तरी कोण? या प्रसिद्ध अभिनेत्रीला करतोय डेट

Bigg Boss च्या घरात राडा घालणारा आदिश वैद्य नक्की आहे तरी कोण? या प्रसिद्ध अभिनेत्रीला करतोय डेट

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेत आदिश वैद्यने राडा घातला आहे. घरात राडा घालणारा आदिश घराबाहेर देखील त्याच्या लव्हलाईफमुळे चर्चेत असतो.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेत आदिश वैद्यने राडा घातला आहे. घरात राडा घालणारा आदिश घराबाहेर देखील त्याच्या लव्हलाईफमुळे चर्चेत असतो.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेत आदिश वैद्यने राडा घातला आहे. घरात राडा घालणारा आदिश घराबाहेर देखील त्याच्या लव्हलाईफमुळे चर्चेत असतो.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 12ऑक्टोबर: कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi 3 )हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या बराच पसंतीस उतरत आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये होणारे वेगवेगळे टास्क, घरातील सदस्यांमध्ये होणारे वाद - विवाद, भांडण, मैत्री हे सगळचं चर्चेचे विषय आहेत. बिग बॉस मराठीचा मराठमोळा अंदाज प्रेक्षकांना (Bigg Boss Marathi 3 Latest Update) पसंत पडत आहे. सदस्य एखाद्या मालिकेचे वा सिनेमामधील पात्र म्हणून लोकांसमोर येत नसून ते जसे आहेत तसे ते प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत कोणताही मुखवटा न बाळगता ! बिग बॉस मराठी हा कार्यक्रम प्रत्येक दिवशी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. . बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नुकतीच एका सदस्याची एन्ट्री झाली आहे. सगळ्यांचा लाडका आदिश वैद्य (adish vaidya) वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे घरामध्ये एंटर झाला आहे. आदिशच्या अचानक घरामध्ये झालेल्या एंट्रीमुळे घरातील संपूर्ण वातावरणच बदलून गेले आहे. पहिल्याच दिवशी त्याने जय दुधाणे याच्यासोबत पंगा घेतला आहे. घराच येताच घऱ हालवून सोडणारा हा आदिश वैद्य नेमका आहे तरी कोण ..हेच आपण आज जाणून घेणार आहे.

मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये केले आहे काम

आदिशने मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. कुंकू टिकली आणि टॅट्टू ही त्याने अभिनेता म्हणून केलेली पहिली टीव्ही मालिका आहे. पंचवीशीतला तरुण आणि देखणा चेहरा म्हणून आदिश मराठी मालिकेतून लोकप्रिय झाला होता. रात्रीस खेळ चाले या लोकप्रिय मालिकेत देखील तो महत्वाच्या भूमिकेत दिसला होता. यासोबतच जिंदगी नॉट आउट, बॅरिस्टर बाबू, गुम है किसीं के प्यार में, या हिंदी तसेच मराठी मालिकांमध्ये त्याने काम केले आहे. गुम है किसीं के प्यार में या मालिकेतून त्याने मोहितचे पात्र साकारले होते. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. बिग बॉसच्या घरात येण्यासाठी काही दिवसांपूर्वीच त्याने या मालिकेतून एक्झिट घेतली होती.

या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट

यासोबत आदिश त्याच्या लव्हलाईफमुळे देखील सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतो. तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. आदिशची गर्लफ्रेंड देखील मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आदिश गेल्या काही वर्षांपासून अभिनेत्री “रेवती लेले” हिला डेट करत आहे.

वाचा :Bigg Boss Marathi: जयच्या टीमने आदिश वैद्यला केलं टार्गेट! उत्कर्षने म्हटलं 'कॉमेडी'तर गायत्रीने केली त्याच्या चालण्याची नक्कल

रेवती उत्कृष्ट नृत्यांगना असून या दोघांनी रात्रीस खेळ चाले, नागीण, जिंदगी नॉट आउट सारख्या मालिकेतून एकत्रित काम केले आहे. स्वामिनी या लोकप्रिय मराठी मालिकेत तिने रमाबाईंची भूमिका निभावली होती. या भूमिकेमुळे रेवतीला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. वर्तुळ,आपकी नजरों ने समझा अशा आणखी हिंदी मराठी मालिकेत तिने महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. रात्रीस खेळ चाले या मालिकेतून दोघांच्यात मैत्रीचे सूर जुळून आले होते त्यानंतर हे दोघेही एकमेकांना पसंत करू लागले. या दोघांची जोडी प्रेक्षकांना देखील खूप आवडते.

आता आदिशने बिग बॉस मराठीच्या घऱात प्रवेश तर केला आहे मात्र त्याच्या घरात येण्याने घरात काय बदल होणार तसेच तो कोणाच्या ग्रुपमध्ये सहभागी होणार..या सगळ्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

First published:

Tags: Bigg boss, Bigg boss marathi, Colors marathi, Marathi entertainment, Tv actor, Tv serial