मुंबई , 11 ऑक्टोबर : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 3 )घरात आज सीजनचा पहिला वाईल्ड सदस्य एंट्री करणार आहे. आणि घरामध्ये जायच्या आधीच बिग बॉसने आदिशला खूप कठीण टास्क देणार आहेत. म्हणजे त्याचा खेळ घरात जाण्याअगोदरच सुरू होणार आहे असे दिसून येते आहे. आदिशला (adish vaidya) पॉवर कार्ड मिळविण्याची संधी बिग बॉस देणार आहेत आणि ती संधी त्याने स्वीकारली देखील आहे. पण (Bigg Boss Marathi 3 Latest Update) त्याच्या बदल्यात घरातील कोणत्याही तीन सदस्यांना त्याची किंमत मोजावी लागणार आहे. ती म्हणजे बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घरातील तीन सदस्यांना रात्रभर जागून घराचे पहारेकरी बनावे लागणार आहे. यानंतर घरात येताच आदिश आणि जय दुधाणे (jay dudhane) यांच्यात तुफान राडा झाल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
या व्हिडिओमध्ये आदिश आणि जय दोघे ही एकमेकांशी भांडताना दिसत आहे. आदिश जयला म्हणताना दिसत आहे की,मला फालतू अॅटिट्यूड द्यायचा नाही..बॉडी वगैरा दुस-यांना दाखवायची...मला नाही. यानंतर जय देखील आदिशच्या रागाने जवळ जाताना दिसत आहेत. यावर आदिश म्हणाताना दिसत आहे की, बिग बॉस तुम्हाला सांगतोय पुन्हा हा जर जवळ आला तर सगळे रुल्स गेले उडत ' कुठल्यातरी टास्क दरम्ययान त्यांच्यात जबरदस्त जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या दोघांच्यात नेमके कशावरून आणि का भांडण झाले आहे हे येणाऱ्या भागातच समजणार आहे.
View this post on Instagram
आदिश घरात आल्यामुळे घरातली मंडळी तर शॉकमध्येच आहे मात्र त्याचे पहिल्याच दिवशी अशे वागणे पाहून प्रेक्षक देकील अवाक झाले आहेत. सर्वांनाच आजच्या भागाची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. तसंच तो ए ग्रुपच्या सदस्यांसोबत जाणार की बी ग्रुपच्या हे पाहणं सुध्दा रंजक ठरणार आहे.
यासोबत जयची घरातील मैत्रीण स्नेहा आदिशला त्याच्या येणावऱून सुनावतान दिसत आहे. ती म्हणत आहे की, आल्या आल्या त्रास दिला तुम्ही सगळ्यांना. जसं की आमचे तीन लोकं जखमी केले. त्यावर आदिश म्हणाला, कुठले तरी तीन होणारच होते. जर तू माझ्या जागी असतीस तर काय केलं असत ? स्नेहा म्हणाली, माझी पध्दत वेगळी असती. मी वेगळ्या पध्दतीने डील केलं असंत. म्हणजे माझ्या पध्दतीने मी डील केलं असंत. नॉट नेसेसरी की आपल्या कोणत्या गोष्टीने समोरच्याला त्रास झालाच पाहिजे, त्याचा त्रास कमी करूसुध्दा गोष्टी करू शकतो. आदिश म्हणाला, “त्या दृष्टीने मी पूर्ण प्रयत्न केला आहे. बघूया पुढे अजून काय काय घडत ? कोणकोणत्या गोष्टी खटकतात ?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss, Bigg boss marathi, Colors marathi, Marathi entertainment