Home /News /entertainment /

Bigg Boss Marathi : स्नेहा आणि जयच नेमकं चालंलय तरी काय? किचनमधील 'तो' VIDEO VIRAL

Bigg Boss Marathi : स्नेहा आणि जयच नेमकं चालंलय तरी काय? किचनमधील 'तो' VIDEO VIRAL

सध्या सगळीकडे बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या (Bigg Boss Marathi 3) सीजनची चर्चा आहे. या घराच कधी भांडण तरी कधी स्पर्धकांमध्ये प्रेम फुलताना पाहण्यास मिळते. सध्या या घऱात दो दिल मिल रहे है मगर चुप के चुपे..असं काहीसं चित्र आहे.

  मुंबई , 21 ऑक्टोबर : सध्या सगळीकडे बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या (Bigg Boss Marathi 3) सीजनची चर्चा आहे. या घराच कधी भांडण तरी कधी स्पर्धकांमध्ये प्रेम फुलताना पाहण्यास मिळते. सध्या या घऱात दो दिल मिल रहे है मगर चुप के चुपे..असं काहीसं चित्र आहे. बिग बॉसच्या घराच मागच्या काही दिवसांपासून जय दुधाणे  (jay dhudhane) आणि स्नेहा वाघ  (sneha wagh)  यांच्यातील मैत्री वाढतच आहे. या दोघांच्यातील वाढती जवळीकता पाहता यांच्यात काय तरी सुरू आहे अशीच चर्चा रंगली आहे. त्यातच आता त्यांचा एका नवीन व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये हे दोघेही रात्रीच्या वेळी किचनमध्ये मस्ती करताना दिसत आहेत. जय आणि स्नेहा किचनमध्ये दोघेच आहेत. यावेळी दोघही एकमेंकाशी मस्ती करताना दिसत आहे. स्नेहा मजेत जयला मारताना दिसत आहे. त्यांच्यामधील मैत्रीची चर्चा तर सगळीकडेच आहे. घरात स्नेहा बऱ्याचवेळा जयची बाजू घेताना दिसते. जय देखील नेहासोबत वेळ घालवताना दिसतो. तसेच या शोमध्ये येण्यापूर्वी देखील जयने शोसाठी कनेक्शन बनवायची गरज पडली तर ते देखील करेल असे सांगितले होते. त्यामुळे सध्या या दोघांच्यातील मैत्री पाहता यांच्यात काय तरी सिजत तरी नाही ना..अशी चर्चा आहे.
  बिग बॉस मराठीच्या घरातील “चल रे भोपळ्या टुणूक टुणूक” या कॅप्टन्सी कार्या दरम्यान काल घरामध्ये बरेच राडे बघायला मिळाले. बिग बॉस मराठीच्या घारतील काही सदस्यांनी नियमभंग देखील केले. आणि याचमुळे बिग बॉस यांनी सदस्यांची कडक शब्दात केवळ कानउघडणीच नाही केली तर विशाल, गायत्री आणि स्नेहा यांना त्याचे परिणाम देखील भोगावे लागले. कुठलेही कार्य पार पाडताना वेगवेगळया युक्त्या वापरणे योग्यच असते. पण, ते पार पाडत असताना धक्काबुक्की होणे, कुठल्याही सदस्याला शारीरिक इजा होणे अतिशय निंदनीय आहे. वाचा : आज काचेच्या आडून आर्यनने घेतली बापाची भेट; प्रत्यक्ष भेटीसाठी मोठी प्रतीक्षा बिग बॉस यांनी जय, उत्कर्ष, विकास आणि आदिशला सक्त ताकीद दिली. तर, विशाल निकमने काल बिग बॉसच्या घरातील प्रॉपर्टिचे नुकसान केले आणि त्यामुळे या कृत्याचा बिग बॉस यांनी तीव्र शब्दात निषेध केला. प्रॉपर्टिचे नुकसान ही अक्षम्य चूक असल्याने विशालला बिग बॉस यांनी शिक्षा म्हणून पुढील आठवड्यातील घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी थेट नॉमिनेट केले. ताकीद दिल्यानंतर देखील काही सदस्यांकडून नियमांची पायमल्ली करण्यात आली. हे कार्य खिलाडूवृत्तीने खेळायचे होते. पण तसे नाही झाले. आक्रमकता आणि धक्काबुक्की कार्यामध्ये केली गेली. ही वागणूक लज्जास्पद असून बिग बॉस यांनी घरातील सर्व सदस्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. वाचा : बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी जान्हवी कपूरने केला होता हा कोर्स; आर्यन खाननेही.... बिग बॉस यांनी साप्ताहिक कार्य रद्द केले. तर गायत्री आणि स्नेहा रागावरचे नियंत्रण गमावून आक्रमक झाल्या ज्यामुळे सदस्यांना शारीरिक इजा होऊ शकत होती आणि बिग बॉस यांना हे अमान्य आहे. आणि म्हणूनच त्या दोघींना देखील पुढील आठवड्यातील घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी थेट नॉमिनेट केले. आता घराच नवीन कॅप्टन कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bigg boss marathi, Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या