Bigg Boss Marathi 2 - अभिजीत बिचकुलेंचा उडालाय गोंधळ, तर किशोरी शहाणेंना कोसळलं रडू

big boss marathi 2 च्या घरात टास्क दरम्यान प्रत्येकच सदस्याची कसोटी लागते. पण यामध्ये कधी कधी घरातील इतर सदस्य दुखावले जातात.

News18 Lokmat | Updated On: Jun 5, 2019 07:30 PM IST

Bigg Boss Marathi 2 - अभिजीत बिचकुलेंचा उडालाय गोंधळ, तर किशोरी शहाणेंना कोसळलं रडू

मुंबई, 05 जून : बिग बॉसच घर सदस्यांच्या प्रत्येक भावभावनांचा साक्षी आहे. राग, प्रेम, तिरस्कार, हसण आणि रडणं. १०० दिवस एका घरामध्ये रहाण सोपी गोष्ट नक्कीच नसतं. या १०० दिवसाच्या कालावधीमध्ये सदस्य या घरामध्ये प्रत्येक गोष्ट अनुभवतात... टास्क दरम्यान प्रत्येकच सदस्याची कसोटी लागते. हा टास्क सदस्य कसा पूर्ण करतात हे महत्वाचे असते. पण यामध्ये कधी कधी घरातील इतर सदस्य दुखावले जातात. नुकताच 'चोर बाजार' या टास्क दरम्यान किशोरी शहाणे आणि शिवानी सुर्वे मध्ये चांगला वाद झाला आणि त्यांनी शिवानीला सायको देखील म्हटलं... त्यावर उत्तरादखल शिवानीने 'किशोरी शहाणे असतील ते त्यांच्या घरी, माझ्यासमोर आवाज नाही करायचा' असं किशोरी यांना सुनावलं.


सलमानचा ‘दबंग’ अवतार, भरगर्दीत स्वतःच्याच बॉडीगार्डच्या कानशिलात लगावली, Video Viral

किशोरी शहाणे अगदी पहिल्या दिवसापासून सगळ्या सदस्यांशी मिळून मिसळून रहात आहेत... त्यांचा आधार घरातील बाकी सदस्यांना वाटत आहे... पण बिग बॉस यांनी दिलेल्या चोर बाजार या टास्क दरम्यान शिवानी आणि किशोरी मध्ये वाद झाल्यानं घरातलं वातावरण थोडं बदललं आहे. या टास्क दरम्यान किशोरी यांचं सामान उध्वस्त केलं, त्यांनाच टार्गेट केलं जातंय या गोष्टीचं किशोरी शहाणे यांना खूप वाईट वाटलं. आपल्या मनात काय आहे हे त्यांनी बिचुकलेंना सांगितलं. अभिजित बिचुकलेनी किशोरीजींना धीर द्यायचा प्रयत्न केला. तसेच मैथिलीनं देखील किशोरी शहाणे यांना समजवण्याचा प्रयत्न केला.

...अभिजीत केळकर मारतोय वीणावर लाईन?

Loading...

चोर बाजार या टास्क मध्ये वीणा पोलिस तर अभिजित केळकर चोर आहे... पोलिसापासून सुटण्यासाठी अभिजीत शक्कल लढवत आहेत... तर किशोरी शहाणे आणि इतर सदस्य या गोष्टीची गंमत घेत आहेत... अभिजीतने पोलिसावर म्हणजेच वीणावर लाईन मारण्याचा प्रयत्न करतो आहे... टास्क दरम्यान अशी बरीच गमंत सदस्यांमध्ये बघायला मिळते... अभिजीत केळकरची ही युक्ती त्याच्या किती उपयोगी पडते आज कळेलच...


Bharat ची अभिनेत्री दिशा पाटनी सारखी फिगर हवी, फॉलो 'हा' डाएट प्लान

दुसरीकडे 'पोपटाचा पिंजरा' या टास्क मध्ये शिवानी आणि शिव मध्ये काल चांगलाच वाद रंगला. कोण कोणाचा पक्षी पिंजऱ्यामध्ये टाकणार .... आणि परागने शेवटी वादाला कंटाळून नेहाला नॉमिनेट केले म्हणजे या आठवड्यामध्ये नेहा, अभिजीत केळकर, वीणा जगताप, पराग कान्हेरे, मैथीलि जावकर, माधव देवचके हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले आहेत.. बघू आता कोणत्या सदस्य बिग बॉसच्या घरातून बाहेर जातो...


अभिनेत्रीच्या दारुड्या नवऱ्यावर न्यायालयाने दिली अनोखी शिक्षा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2019 07:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...