महिला स्पर्धक जिंकणार का 'बिग बॉस' फिनाले?

महिला स्पर्धक जिंकणार का 'बिग बॉस' फिनाले?

'बिग बॉस' मराठीचा पहिला सीझन सध्या कमालीचा गाजतोय. मात्र या घराचं वैशिष्ट्य म्हणजे अंतिम सहा स्पर्धकांमध्ये चार महिला स्पर्धकांचा असलेला सहभाग.

  • Share this:

विराज मुळे,मुंबई, 21 जुलै : 'बिग बॉस' मराठीचा पहिला सीझन सध्या कमालीचा गाजतोय. मात्र या घराचं वैशिष्ट्य म्हणजे अंतिम सहा स्पर्धकांमध्ये चार महिला स्पर्धकांचा असलेला सहभाग. खरं तर या शोमध्ये पहिल्या दिवसापासून महिलांचाच प्रचंड मोठा दबदबा होता. महिलांचं वर्चस्व या शोवर कायम राहण्यासाठी अशा काय गोष्टी कारणीभूत ठरल्या ते पाहुयात.

'बिग बॉस'चा पहिला सीझन नक्की कसा असेल याची उत्सुकता खरं तर सगळ्यांनाच होती. मात्र शो सुरू झाला तेव्हा त्यात 8 महिला आणि 7 पुरूष अशा एकूण 15 स्पर्धकांचा सहभाग होता. मात्र फिनालेपर्यंत पोहोचेपर्यंत फक्त दोन पुरूष आणि चार महिला स्पर्धक फायनलमध्ये गेल्यात. थोडक्यात काय तर महिला स्पर्धकांचं पारडं या स्पर्धेत जड राहिलंय.

यात प्रामुख्याने स्वतःला हवं तेच करणं, पटकन निर्णय घेऊन कृती करणं, मल्टीटास्किंग करता येणं, घरकाम नीट करणं, उत्तम जेवण बनवता येणं, आपल्यासोबत इतरांची काळजी घेणं असे अनेक गुण महिला स्पर्धकांमध्ये असल्याने त्याचा फायदा त्यांना या गेम शोमध्ये झाला, तर दुसरीकडे गॉसिप करणे, एकमेकांच्या पाठीमागून कुचाळक्या करणे, स्वतःच्या मतानुसार इतरांना वागायला भाग पाडणे, काहीही झालं तरीही चूक मान्य न करणे असे काही महिलांमध्ये हटकून दिसणारे अवगुणही या घरात टिकण्यासाठी या महिला स्पर्धकांना तेवढेच उपयुक्त ठरले.

मेघा आणि सईची घरात फुललेली मैत्री, आऊंचा प्रेमळ स्वभाव, स्मिताचं कुणाच्याही पाठीमागून न बोलणं, रेशमचं प्रमाणाबाहेर गोष्टी न ताणणं, या गोष्टींमुळे बिग बॉसचा पहिल्या सीझनच्या महिला प्रेक्षकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन घरात आलेली शर्मिष्ठावरही प्रेक्षकांनी तिच्यावर तेवढंच प्रेम केलं. पुष्कर आणि आस्तादने वेळोवेळी महिलांशी जुळवून घेण्यात यशस्वी ठरल्यानेच फिनालेपर्यंत पोहोचले.

या सगळ्याच्या जोरावर महिला वर्गाने या घरात आपला दबदबा कायम ठेवलाय. बिग बॉस मराठीची पहिली विजेती एक महिला ठरली तर त्याहून मोठी आनंदाची गोष्ट दुसरी नसेल. मात्र या सीझनवर महिलांचा पगडा कायम राहिलाय हेच बिग बॉसच्या घरातलं अंतिम सत्य आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 21, 2018 05:13 PM IST

ताज्या बातम्या