S M L

सलमान खान आणि अमिताभ बच्चन लवकरच आमने सामने

बाॅलिवूड शहेनशहा आणि दबंग खान सहसा समोरासमोर येत नाहीत. पार्टीत समोर आले तर नुसते हसून पुढे जातात.

Updated On: Sep 13, 2018 07:35 AM IST

सलमान खान आणि अमिताभ बच्चन लवकरच आमने सामने

मुंबई, 13 सप्टेंबर : बाॅलिवूड शहेनशहा आणि दबंग खान सहसा समोरासमोर येत नाहीत. पार्टीत समोर आले तर नुसते हसून पुढे जातात. ऐश्वर्याच्या सासऱ्यांना सलमान काही भेटू इच्छित नाही. पण लवकरच दोघांमध्ये टशन रंगणार आहे.

16 सप्टेंबरपासून कलर्सवर बिग बाॅसचा बारावा सीझन सुरू होत आहे. आणि बहुचर्चित केबीसी अगोदरच सुरू झालाय. त्यामुळे आता दोन शोजची टक्कर होणार आहे. स्पर्धा सुरू होईल. कोणाची टीआरपी पुढे जातोय, याची चर्चा झडेल. प्रेक्षकांना गंमत येणार आहे.

बिग बाॅसमध्ये काॅमेडियन भारती सिंग आणि तिचा नवरा असणार आहे. यावेळी या घरात काही रिअल लाईफ जोड्या एकत्र दिसतील असं आधीच जाहीर करण्यात आलंय. यात तीन जोड्या या सेलिब्रिटीज असतील तर तीन सर्वसामान्य असतील. मात्र घरात जाणाऱ्या या जोड्या चांगल्याच मालामाल होणारेत. यात आसामी अभिनेत्री माहिका शर्मा आणि तिचा परदेशी बॉयफ्रेंड डॅनी डी ही सगळ्यात जास्त मानधन मिळवणारी जोडी ठरणारे. या दोघांना शोमध्ये सहभागी होण्यासाठी आठवड्याचे 95 लाख रूपये मिळणारेत. डॅनी हा अडल्ट स्टार असून सध्या तो माहिकाला डेट करतोय. डॅनी एका प्राॅडक्शन हाऊसचा मालक आहे. त्याच्याकडे 7 हेलिकाॅप्टर्स आहेत.

2000सालापासून केबीसी सुरू झालं. आणि गेली अठरा वर्ष हा शो प्रचंड लोकप्रिय आहे. अमिताभ बच्चन यांची जादू अजूनही तशीच आहे. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटीजनी हजेरी लावलीय. शाहरूख खान, सलमान खान, अनिल कपूर, फराह खान, प्रियांका चोप्रा, करिना कपूर, रणवीर सिंग, राणी मुखर्जी, कतरिना , माधुरी दीक्षित, काजोल, अजय देवगण आणि घरातलं माणूस म्हणजे अभिषेक बच्चन अशी मोठी यादी आहे. पण बिग बीना विचारलं की तुम्हाला कोणाबरोबर केबीसी खेळायला आवडेल?

तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं माहितीये? आराध्या बच्चन. हो, त्यांना आपल्या लाडक्या लेकीबरोबर केबीसी खेळायचंय. पुढे ते म्हणाले, आता घरी गेल्यावर मला आराध्याबरोबर केबीसी खेळावंच लागेल. आपलं जनरल नाॅलेज सर्वात कमी असल्याचंही त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 13, 2018 07:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close