S M L

महेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर?

बिग बॉसद्वारे सध्या घराघरात पोहोचलेले महेश मांजरेकर लवकरच काँग्रेसवासी होणार अस वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलंय.

Renuka Dhaybar | Updated On: Apr 26, 2018 09:58 AM IST

महेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर?

26 एप्रिल : बिग बॉसद्वारे सध्या घराघरात पोहोचलेले महेश मांजरेकर लवकरच काँग्रेसवासी होणार अस वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलंय. यानुसार मे महिन्यात होणाऱ्या पक्ष्यांच्या मोठ्या कार्यक्रमात मांजरेकर पक्ष प्रवेश करतील असा दावा करण्यात आला आहे.

मांजरेकर यांनी 2014ची लोकसभा निवडणूक मनसे कडून लढवली होती. उत्तर पश्चिम मतदारसंघातून ते या निवडणुकीला सामोरे गेले होते पण त्यांचा पराभव झाला होता. पण या पराभवानंतर ते आता पुन्हा राजकारणात झळकणार आहे.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे मांजरेकरांचे चांगले मित्र आहेत. त्यांनीच त्यांची काँग्रेसवासी होण्यासाठी मनधरणी केलाचं सांगण्यात येत आहे. आता राज ठाकरे यांच्याशी त्यांची असलेली मैत्रीही सर्वश्रुत असल्याने एका मित्राच्या सांगण्यावरून ते दुसऱ्या मित्राला दुखावणार का याची चर्चा रंगलीये. दरम्यान, मांजरेकरांनी याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 26, 2018 09:58 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close