मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'मी तिथे असते तर..' मूळची अफगाणी असलेल्या 'या' Bigg Boss फेम अभिनेत्रीला सतावतेय मायदेशाची चिंता

'मी तिथे असते तर..' मूळची अफगाणी असलेल्या 'या' Bigg Boss फेम अभिनेत्रीला सतावतेय मायदेशाची चिंता

सिनेसृष्टीत अनेक परदेशी कलाकारही आहेत. त्यातीलच एक म्हणजे बिग बॉस फेम अभिनेत्री अर्शी खान (Arshi Khan). अर्शीला आता भारतात स्थायिक होऊन काही वर्षे उलटली आहेत. पण तिचे अनेक नातेवाईक आणि कुटुंबीय हे अफगाणिस्तानात आहेत, त्याची तिला चिंता सतावत आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई 18 ऑगस्ट :  सध्या जगभरात अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) जे काही सुरू आहे त्याचीच चर्चा सुरू आहे. जगभरात विखुरलेल्या अफगाणी नागरिकांना (Afghani citizens) त्यांच्या नातेवाईकांची, मित्रमैत्रिणींची आता काळजी वाटू लागली आहे. भारतातही असे अनेक नागरिक आहेत. याशिवाय काही सेलिब्रिटीज मध्येही त्यांचा समावेश आहे. सिनेसृष्टीत अनेक परदेशी कलाकारही आहेत. त्यातीलच एक म्हणजे बिग बॉस फेम अभिनेत्री अर्शी खान (Arshi Khan). अर्शीला आता भारतात स्थायिक होऊन काही वर्षे उलटली आहेत. पण तिचे अनेक नातेवाईक आणि कुटुंबीय हे अफगाणिस्तानात आहेत, त्याची तिला चिंता सतावत आहे. अर्शी खानचा जन्म हा अफगाणिस्तानात झाला होता. त्यानंतर ती कुटुंबीयांसोबत भारतात आली. तर गेली कित्येक वर्षे ते भारतातच रहात आहेत. पण सध्याची अफगाणिस्तानची स्थिती पाहून तिला फारच चिंता वाटत आहे. तेथील महिला आणि लहान मुलांचं काय होत होत असेल असही ती म्हणतेय.
  अर्शी म्हणाली, “मी एक अफगाणी पठाण आहे. पण या गोष्टी मला फारच घाबरवत आहे, माझ्या अंगावर काटे उभे राहतात. मला तेथील महिलांची आणि नागरिकांची चिंता सतावतेय. माझा जन्म तिथे झाला आणि मी त्यांच्यात असते तर.. बस याच गोष्टीने खूप घाबरते मी. माझी किंकाळी फुटते यानेच. मी खूप दुखी आहे. आणि व्यवस्थित जेवण देखील खाऊ शकत नाहीये. माझ्या कुटुंबाचे लोक प्रार्थना करत आहेत की देवा त्या लोकांची मदत कर.” दरम्यान अर्शी खान बिग बॉस 14 (Big Boss 14) मध्ये दिसली होती. तर आता पुन्हा एकदा बिग बॉस ओटीटी (Big Boss OTT) मध्ये ती दिसणार आहे. करण जोहर होस्ट करत असलेल्या या शो मध्ये आता अर्शी दिसणार आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Big boss, Bigg Boss OTT, Entertainment

  पुढील बातम्या