Home /News /entertainment /

Video : 'बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता', बिचुकलेची तिखट प्रतिक्रिया

Video : 'बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता', बिचुकलेची तिखट प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या या नाराजी नाट्यावर राजकारणातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. शिवसैनिकांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेनं ( Abhijeet Bichukale) देखील या नाराजी नाट्यावर तिखट प्रतिक्रिया दिली

पुढे वाचा ...
    मुंबई, 21 जून:  सोमवारी विधान परिषदे निवडणूकीत भाजपचा विजय झाला आणि आज शिवसेनेच्या नाराजी नाट्याला सुरुवात झाली. शिवसेनेचे बडे नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) हे आमदारांबरोबर नॉट रिचेबल झाले. महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या या नाराजी नाट्यावर राजकारणातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. शिवसैनिकांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेनं ( Abhijeet Bichukale) देखील या नाराजी नाट्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. 'आज बाळासाहेब ठाकरे असते त्यांनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता', अशी प्रतिक्रिया दिली आहे. अभिजीत बिचुकलेचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ पार पडणार आहे. या सोहळ्यानिमित्त अभिजीत बिचुकले आळंदीला भेट दिली. यावेळी शिवसेनेच्या नाराजी नाट्यावर प्रतिक्रिया देत अभिजीत बिचुकले म्हणाले, 'मी अपक्ष आहे. माझा शिवसेनेशी संबंध नाही.  पण आज शिवसेनेत जे नाराजी नाट्य सुरु आहे ते पाहून बाळासाहेब ठाकरेंनी एकनाथ शिदें यांच्या कानाखाली जाळ काढला असता. हे नेते बाळासाहेब ठाकरेंच्या जिवावरच मोठे झाले आहेत याविषयी कोणतेही दुमत नाहीये'. अभिजीत बिचुकले पुढे म्हणाले, 'महाराष्ट्राच्या राजकारणात जे सुरू आहे ते महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचं नाही. आज टीव्हीवर एकनाथ शिंदे यांच्याविषयी एवढ्या गोष्टी दाखवल्या जात आहेत. काही आमदार एकनाथ शिंदे यांच्या तर काही आमदार ठाकरेंच्या पाठीशी उभे आहेत. सरकार पडेल की याबाबत मी सांगू शकत नाही पण उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहावे अशी माझी इच्छा आहे'. हेही वाचा - BREAKING : महाराष्ट्रात संध्याकाळपर्यंत राष्ट्रपती राजवट? सूरतमध्ये मोठी घडामोड मंत्री एकनाथ शिंदे 29  आमदारांसह गुजरातच्या सूरत येथे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर हे एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी सूरतला रवाना झाले आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी 'जय महाराष्ट्र' असं सूचक ट्विट केलं आहे. त्याच्या या ट्विटमुळे राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.  एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह असलेले 29 आमदार काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पाठिंबा देणार नाहीत असं पत्र राज्यपालांना देऊ शकतात. त्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणार मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे.
    Published by:Minal Gurav
    First published:

    Tags: Cm, Eknath Shinde, Maharashtra politics, Uddhav thackeray

    पुढील बातम्या