मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

करण जोहरच्या एन्ट्रीने 'बिग बॉस' वादाच्या भोवऱ्यात; वाचा का होतेय Boycott ची होतेय मागणी

करण जोहरच्या एन्ट्रीने 'बिग बॉस' वादाच्या भोवऱ्यात; वाचा का होतेय Boycott ची होतेय मागणी

अनेक वर्षे सलमान खान (Salman Khan) हा शो होस्ट करत आहे. पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर बॉलिवूडचा दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) होस्ट करणार आहे.

  • Published by:  News Digital

मुंबई 25 जुलै: छोट्या पडद्याचा अत्यंत लोकप्रिय शो बिग बॉसचं (Big Boss) नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण यावेळी कार्यक्रमात अनेक बदल करण्यात आले आहेत. फक्त टीव्ही वरच नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT platform) हा शो पाहता येणार आहे. पहिले सहा आठवडे प्रिमियर पाहता येणार आहेत. इतकच नाही तर होस्ट देखील बदलला गेला आहे. अनेक वर्षे सलमान खान (Salman Khan) हा शो होस्ट करत आहे. तर यावेळीही तो करणार आहे पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर बॉलिवूडचा दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) होस्ट करणार आहे.

नुकतीच ही बातमी निर्मात्यांकडून जाहीर करण्यात आली. पण त्यानंतर प्रेक्षकांची मात्र तीव्र नापंसती पाहायला मिळत आहे. काही जण या निर्णयामुळे खुश आहेत तर काहींनी तीव्र नापंसती दर्शवली आहे. अनेकांनी ट्विटरवर कार्यक्रामला बहिष्कृत करण्याचीही मागणी केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

याशिवाय काही दर्शकांनी सुचवलं आहे की, पूर्व बिग बॉस स्पर्धक सिद्धार्थ शुक्लाने (Siddharth Shukla) या शो ला होस्ट करावं. ‘बिग बॉस 15’ (Big Boss 15) साठी प्रेक्षकांची उत्सुकता पाहायला मिळत आहे. पण करण जोहरच्या एन्ट्रीने नाराजी दर्शवली जात आहे.

यावर आता युझर्सकडून निरनिराळे ट्वीट्स केले आहेत. कोणी बहिष्काराची मागणी केली तर कोणी, शो पाहणार नाही म्हटलं. तर अनेकांनी सलमान खानचं होस्ट म्हणून हवा असंही म्हटलं.

दरम्यान 8 ऑगस्टला शोचा प्रिमियर होणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म वूटवर (Voot)  हा शो 24 तास पाहता येणार आहे. तर बिग बॉस 15 च्या नव्या स्पर्धकांना पाहण्यासाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत.

First published:

Tags: Big boss, Karan Johar, Salman khan, Tv shows