• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Big Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी? पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा

Big Boss 15 : आता तुम्हालाही होता येणार सहभागी? पाहा शोची काय असणार नवी रुपरेषा

Big boss 15

Big boss 15

बिग बॉसच्या नव्या पर्वात आता निर्माते नवी रुपरेषा घेऊन येत आहेत. पाहा प्रेक्षकांनाही मिळू शकते संधी.

 • Share this:
  मुंबई 19 जून : छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय पण तितकाच विवादीत रियॅलिटी शो बिग बॉसचा (Big boss) नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण यावेळी कार्यक्रमाची रुपरेषा बदलली जाणार असल्याचं समोर येत आहे. तर आता प्रेक्षकांनाही यात सामील होण्याची संधी मिळणार असल्याचं वृत्त पुढे येत आहे. कार्यक्रमाचं मागील पर्व विशेष लोकप्रिय ठरलं होतं. टीव्ही अभिनेत्री रुबीना धिलैक (Rubina Dhilaik) या पर्वाची विजेती ठरली होती. याशिवाय इतर स्पर्धकही विशेष हीट ठरले होते. राहुल वैद्य, निक्की तांबोळी, राखी सावंत असे स्पर्धक मागील पर्वात दिसले होते. तर आता या 15 व्या सिझनसाठीही अनेक नावं समोर येत आहेत. (Big boss 15 contestants)
  शोच्या या सिझनसाठी सुरभी चंदना, पार्थ समथान, अनुषा दांडेकर , रिया चक्रवर्ती अशा सेलिब्रिटीझची नावं समोर येत आहे. याशिवाय काही गायक आणि आणखी काही अभिनेत्यांची नावही घेतली जात आहेत. त्यामुळे नक्की कोण कोण सामील होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. पण यावेळी चक्क प्रेक्षकांना सामील होण्याची संधी निर्माते देणार असल्याचं म्हटलं जात आहे.

  हे फोटो पाहून ओळखणार पण नाही; एकेकाळी कसे होते हे स्टार्स पाहून बसेल धक्का

  यासंदर्भात एक पोस्ट बिग बॉस खबरीने केली आहे. ज्यात असं सांगण्यात आलं आहे की , प्रेक्षकांना या कार्यक्रामात सहभागी होण्याची विशेष संधी उपलब्ध होणार आहे. नेहमी स्टार्सना ही संधी मिळते पण यावेळी सामान्य नागरिकांना ही संधी देण्यात येणार आहे. 4 ते 5 असे लोक यामध्ये सहभागी होऊ शकतात. वोटींगच्या माध्यामातून ही निवडप्रकिया केली जाणार आहे. त्यामुळे या सिझनमध्ये ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. नेहमीप्रमाणे सलमान खान (Salman Khan) हा शो होस्ट करणार आहे.
  Published by:News Digital
  First published: