मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

BIG BOSS 15 मध्ये मोठा बदल; सलमान ऐवजी ही व्यक्ती दिसणार होस्टच्या रुपात

BIG BOSS 15 मध्ये मोठा बदल; सलमान ऐवजी ही व्यक्ती दिसणार होस्टच्या रुपात

Big boss 15

Big boss 15

बिग बॉसचा प्रसिद्ध होस्ट सलमान खान नाही तर आणखी एक सेलिब्रिटी शोचं सुत्रसंचालन करताना दिसणार आहे.

  मुंबई 24 जुलै : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो बिग बॉसचा (Big boss 15) नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण यावेळी कार्यक्रमात मोठा बदल दिसून येणार आहे. नुकताच ईदच्या मुहूर्तावर कार्यक्रमाचा प्रोमो (Big boss 15 promo) देखील जाहीर करण्यात आला होता. बिग बॉसच्या प्रेक्षकांसाठी ही फार मोठी बातमी आहे. गेली काही वर्षे बिग बॉसच सूत्रसंचालन करणारा अभिनेता सलमान खान (Salman Khan) नाही तर यावेळी बॉलिवूडचा प्रसिध्द दिग्दर्शक, निर्माता करण जोहर (Karan Johar) यावेळी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. मोठी अपडेट: राज कुंद्राच्या व्यवसायाशी शिल्पाचा काहीच संबंध नाही? क्राइम ब्रँचकडून अभिनेत्रीची कसून चौकशी दरम्यान या वेळी हा शो OTT प्लॅटफॉर्मवर देखील दिसणार आहे. वूट वर (Voot) हा शो पाहता येणार आहे. तर डिजिटल स्पेस वर करण जोहर हा शो होस्ट करताना दिसेल. Voot ने काही दिवसांपूर्वीच बिग बॉस प्रीमियरची घोषणा केली होती. ज्यात प्रेक्षकांना सरळ 6 आठवडे शो पाहता येणार आहे. विशेष म्हणजे 24 तास कधीही हा शो पाहता येणार आहे.  त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता ही वाढली आहे.
  बिग बॉस च्या प्रोमोत मात्र अभिनेता सलमान खान दिसून येत आहे. दरम्यान डिजिटल स्पेस वर करण जोहर दिसणार असून टीव्ही वर सलमान खानच दिसणार आहे. या सिझन साठी अनेकांची नावं चर्चेत आहेत.

  80 च्या दशकात स्मिता पाटील यांच्या 'त्या' पोस्टरने उडवली होती खळबळ; अभिनेत्रीने व्यक्त केला होता संताप

  अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) ते 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील दयाबेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) या कलाकांरांची नावही चर्तेत आहेत. तेव्हा आता शो मध्ये नक्की कोण स्पर्धक असणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Big boss, Entertainment, Karan Johar, Salman khan

  पुढील बातम्या