'या' बाॅलिवूड कलाकारांसोबत सलमानला राहायचेय बिग बाॅसच्या घरात

'या' बाॅलिवूड कलाकारांसोबत सलमानला राहायचेय बिग बाॅसच्या घरात

गेल्या वेळची विजेती शिल्पा शिंदे या ग्रँड प्रीमयरला उपस्थित होती. त्यावेळी तिनं सलमानला विचारलं, बिग बाॅसच्या घरात बाॅलिवूडच्या कुणाला पाहायला तुला आवडेल?

  • Share this:

मुंबई, 17 सप्टेंबर : 'बिग बाॅस 12'चा प्रीमियर मोठा रंगतदार झाला. बिग बाॅसच्या घरात यावेळी विचित्र जोड्यांनी प्रवेश केलाय. गेल्या वेळची विजेती शिल्पा शिंदे या ग्रँड प्रीमयरला उपस्थित होती. त्यावेळी तिनं सलमानला विचारलं, बिग बाॅसच्या घरात बाॅलिवूडच्या कुणाला पाहायला तुला आवडेल?

यावर सलमान म्हणाला, 'मला शोचा टीआरपी तर वाढवायचा आहे. त्यासाठी आमिर खान आणि शाहरूख खानला घरात पाहायला नक्की आवडेल.' आणि हिराॅईन्सपैकी कोण आवडेल, यावर सल्लूमियाँनं राणी मुखर्जी, जॅकलीन फर्नांडिस आणि सोनाक्षी सिन्हाचं नाव घेतलं.

बिग बाॅसमध्ये या कलाकारांना पाहायला तर प्रेक्षकांनाही आवडेल. पण आता घरात गेलेले कलाकार पाहू

अनुप जलोटा- ज्येष्ठ गायक अनुप जलोटा यांची ओळख भक्तीसंगीत, बजन, गझल गाणारे गायक अशी आहे. त्यांना भजन सम्राट म्हणूनही ओळखले जातात. २०१२मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलं.

श्रीष्टी रोड- २०१३ पासून श्रीष्टी हिंदी मालिकांमध्ये काम करत आहे. नुकताच तिचा अभिनेता मनिष नागदेवसह साखरपुडा झाला.

श्रीसंत- माजी भारतीय क्रिकेटपटू श्रीसंतवर बंदी घालण्यात आल्यानंतर त्याने त्याचा मोर्चा छोट्या पडद्यावर वळवला. झलक दिखला जामध्ये त्याने सहभाग घेतला होता. यानंतर तो खतरों के खिलाडी आणि बिग बॉस १२ मध्येही दिसणार आहे.

शिवांशिष मिश्रा आणि सौरभ पटेल- हे दोघंही बिग बॉस १२मध्ये शेतकरी आणि एक व्यावसायिक म्हणून आलेत.

सबा खान आणि सोमी खान- या दोघी बहिणी बिग बॉसमध्ये ‘विचित्र’ जोडी म्हणूनआहेत.

रोमी चौधरी आणि निर्मल सिंह- ही जोडी घरात वकिल आणि पोलिस म्हणून प्रवेश केलाय.

नेहा पेंडसे- मराठमोळ्या नेहाने आतापर्यंत अनेक हिंदी, मराठी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम सिनेमांमध्ये काम केले आहे. मराठीमध्ये जेवढे नेहाचे चाहते आहेत तेवढेच हिंदीमध्येही आहेत.

करणवीर बोहरा- करणवीर हा हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा आहे. आतापर्यंत त्याने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले. त्याच्यासह त्याच्या दोन मुलीही प्रसारमाध्यमांच्या चाहत्या आहेत.

जसलीन मथारू- गायक, अभिनेत्री जसलीन ही मुळची मुंबईची. मिका सिंगसोबत तीन वर्ष तिने भारतभर अनेक कार्यक्रम केले.

दीपिका कक्कर इब्राहिम- दीपिकाही मुळची पुण्याची. ससुराल सिमर का या हिंदी मालिकेतून ती घराघरात पोहोचली. अभिनेता शोएब मलिकसोबत तिने लग्न केले असून पलटन या बॉलिवूड सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

दीपक ठाकूर आणि उर्वशी वानी- ही जोडी घरात गायक आणि त्याची चाहती म्हणून प्रवेश करणार आहे. दीपकने गँग ऑफ वासेपूरमध्ये एक गाणं गायलं होतं.

Bigg Boss 12: सलमान खानच्या घरात असेल एक अस्सल मराठी चेहरा

First published: September 17, 2018, 9:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading