Big Boss 12 : पहिल्यांदाच बिग बाॅसनं स्वत:च केलं नाॅमिनेट!

Big Boss 12 : पहिल्यांदाच बिग बाॅसनं स्वत:च केलं नाॅमिनेट!

बिग बॉसच्या 12व्या पर्वाच्या पहिल्या आठवड्याची कॅप्टन निवडण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वेळ होती ती या पर्वाच्या पहिल्या नॉमिनेशनची.

  • Share this:

मुंबई, 22 सप्टेंबर : बिग बॉसच्या 12व्या पर्वाच्या पहिल्या आठवड्याची कॅप्टन निवडण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वेळ होती ती या पर्वाच्या पहिल्या नॉमिनेशनची. बिग बॉसच्या घरात प्रत्येक वेळेस घरातल्यांच्या बहमताने नॉमिनेशनची प्रक्रिया पार पडते. पण पहिल्याच आठवड्यात बिग बॉसने स्पर्धकांना मोठा झटका दिलाय.

बिग बॉसच्या या सुंदर घरात एक अशी जागा आहे जिथे कुठल्याही स्पर्धकाला जायला आवडणार नाही. ती जागा म्हणजे बिग बॉसच्या घरात असलेली काल कोठडी. पहिल्या आठवड्यात कृती आणि रोशमी कॅप्टन झाल्यानंतर बिग बॉसने या काल कोठडीत कोण जाणार असा प्रश्न घरातील सदस्यांना केला. यावर घरातल्यांना विचार विनिमय करून एक जोडी आणि एक स्पर्धक अशा तिघांची नावं द्यायची होती. घरातल्यांकडून करणवीर बोहरा आणि रोमिल आणि निर्मल या जोडीला निवडण्यात आलं.

घरातील सदस्यांनी घेतलेल्या निर्णयावरून बिग बॉसने या तिघांना काल कोठडीत जाण्याचा आदेश दिला. पण त्यापूर्वीच बिग बॉसने त्यात एक ट्विस्ट अॅड केला. तो म्हणजे, बिग बॉसने या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया न घेता सरळ त्या तिघांना एलिमिनेशनसाठी नॉमिनेट केलं.

घरातील सदस्यांनी या प्रक्रियेला फार महत्त्व न देता हा निर्णय घेतला असल्यामुळे बिग बॉसने हा निर्णय घेतला असावा. बिग बॉसच्या या निर्णयामुळे घरातील सदस्यांना मोठा धक्का बसलाय. पहिल्याच आठवड्यात घरातल्यांना बिग बॉसचा झटका लागलाय. त्यामुळे यापुढे आणखीन काय ट्विस्ट येणार हे पाहणं कुतूहलाचं ठरणार आहे.

VIDEO : पुण्यात डीजेची मागणी, पण सरकारचा विरोध!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2018 05:17 PM IST

ताज्या बातम्या