बिग बाॅस हिंदीच्या नव्या सिझनमध्ये मिलिंद सोमण आणि अंकिता, सूत्रांची माहिती

बिग बाॅस हिंदीच्या नव्या सिझनमध्ये मिलिंद सोमण आणि अंकिता, सूत्रांची माहिती

बिग बॉस हिंदीचा १२ वा सिझन लवकरच सुरू होतोय. यावेळी या घरात काही रिअल लाईफ जोड्या एकत्र दिसतील असं आधीच जाहीर करण्यात आलंय.

  • Share this:

मुंबई, 23 आॅगस्ट : बिग बॉस हिंदीचा १२ वा सिझन लवकरच सुरू होतोय. यावेळी या घरात काही रिअल लाईफ जोड्या एकत्र दिसतील असं आधीच जाहीर करण्यात आलंय. यात तीन जोड्या या सेलिब्रिटीज असतील तर तीन सर्वसामान्य असतील. मात्र घरात जाणाऱ्या या जोड्या चांगल्याच मालामाल होणारेत. यात आसामी अभिनेत्री माहिका शर्मा आणि तिचा परदेशी बॉयफ्रेंड डॅनी डी ही सगळ्यात जास्त मानधन मिळवणारी जोडी ठरणारे. या दोघांना शोमध्ये सहभागी होण्यासाठी आठवड्याचे 95 लाख रूपये मिळणारेत. डॅनी हा अडल्ट स्टार असून सध्या तो माहिकाला डेट करतोय. डॅनी एका प्राॅडक्शन हाऊसचा मालक आहे. त्याच्याकडे 7 हेलिकाॅप्टर्स आहेत.

या शोमध्ये मिलिंद सोमण आणि अंकिता अाहेत, असं सूत्रांकडून कळलंय. त्यांना एका आठवड्याचे 70 लाख मिळणार आहेत. मिलिंद सोमण आणि अंकिता यांनी नुकतंच लग्न केलं, हे आपल्याला ठाऊक आहे. अंकिता मिलिंदपेक्षा 26 वर्षांनी लहान आहे. अंकिता एक एयरहोस्टेस आहे. मिलिंद आणि तिची ओळख एका रॅम्प वॉकच्या दरम्यान झाली. याआधीही मिलिंद सोमणनं आपल्यापेक्षा लहान 21 वर्षाच्या शहाना गोस्वामीला डेट केलं होतं पण नंतर त्यांचा ब्रेकअप झाला.

हेही वाचा

सनी लिओनीची लव्ह स्टोरी - अशी पडली डॅनियलच्या प्रेमात

कृती सनाॅनचे ठुमके पाहायचेत? मग आओ कभी हवेली पे

VIDEO - केरला केरला डोंट वरी केरला, रेहमानच्या सुरांनी दिला धीर

रियॅलिटी शोजमध्ये लोकप्रिय असलेला बिग बॉस पुन्हा एक नवीन सिझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरवर्षी ऑक्टोबरमध्ये येणारा बिग बॉसचा शो यावर्षी मात्र एक महिनापूर्वीच येत आहे. यावर्षी १२वा सिझन असल्याने १२ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. प्रत्येक वेळेस या कार्यक्रमाची एक नवीन थीम ठेवली जाते. यावर्षीची थीमसुद्धा अशीच नवीन आणि रंजक असणार आहे. यावेळी बिग बॉसच्या घरात जोड्यांना एन्ट्री दिली जाणार आहे. मुंबई मिररच्या मते या शोचा प्रोमो देखील शूट झाला आहे. आणि प्रोमोत नवीन ट्विस्ट देखील पाहायला मिळणार आहे. तो ट्विस्ट म्हणजे या प्रोमोमध्ये सलमानच्या मागे दोन चित्रपटांचे पोस्टर्स दिसतायत ते म्हणजे करण-अर्जुन आणि राम- लखन. आता या पोस्टर्सचा नेमका अर्थ काय हे तर प्रोमो प्रदर्शित झाल्यावरच कळेल.

First published: August 23, 2018, 10:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading