बिग बाॅस मराठी : सईने मागितली रेशमची माफी, रेशम माफ करणार का ?

बिग बाॅस मराठी : सईने मागितली रेशमची माफी, रेशम माफ करणार का ?

आजच्या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये कोणत्या जोड्या नॉमिनेट होणार आणि कोणत्या विजयी हे बघणे रंजक असणार आहे.

  • Share this:

मुंबई, 25 जून :  कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरात घडणाऱ्या घडामोडींनी आता वेग घेतलाय. रविवारी घरातून कुणीही बाहेर न पडल्यामुळे आता नव्या खेळाला सुरुवात होणार आहे. आज बिग बाॅसच्या घरात नाॅमिनेशन प्रक्रिया पार पडली. यातही सई आणि मेघाने काही तरी गडबड केल्याचं दिसून येतंय.

'गोल्ड'चा ट्रेलर रिलीज झाला, अक्षयचा लूक पाहिलात का?

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या कालच्या WEEKEND चा डाव या भागामध्ये महेश मांजरेकर यांनी सदस्यांना सांगितले आज एलिमनेशन होणार नाही, सगळे सुरक्षित आहेत. त्यामुळे घरच्यांना खूप आनंद झाला. कालच्या भागामध्ये रेशम सई आणि मेघावर बरीच नाराज असल्याचे दिसून आले.

 

कानगोष्टीच्या खेळामध्ये रेशमने तिचे मत व्यक्त देखील केले. सईकडून झालेल्या चुकीवरून मेघा, शर्मिष्ठा आणि आऊ यांनी बोलून देखील दाखवले की, ज्याप्रकारे रेशमला ती बोलली ते अयोग्य होते आणि यापुढे असे बोलू नकोस. आज सई रेशमची एका वेगळ्याप्रकारे माफी मागणार आहे. तेंव्हा रेशम सईला माफ करणार का ?हे बघणे रंजक असणार आहे.

 

तसंच बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज नॉमिनेशन प्रक्रियेचे कार्य रंगणार आहे. बिग बॉस या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रियेसाठी एक वेगळा टास्क सदस्यांना देणार आहेत. या आठवड्यातील नॉमिनेशन कार्य जोड्यांमध्ये पार पडणार आहे. या कार्यानिमित्त घरामध्ये चार जोड्या बनवण्यात येणार आहेत. प्रत्येक जोडीला एक container देण्यात येणार आहे, त्या container मध्ये वाळू भरलेली असणार आहे.

शत्रुघ्न सिन्हांना करायचंय मराठी सिनेमांत काम

नॉमिनेशन प्रक्रियेमधून सुरक्षित होण्यासाठी सर्व जोड्यांना ईतर जोड्यांच्या container मधील वाळू कमी करायची आहे तसंच आपल्या container मधील वाळू कमी होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. पण या टास्कमध्ये सई आणि मेघाने काही तरी गडबड केल्याचं दिसून येतंय. त्यामुळे कोण घरातून घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट होणार ? या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार ?

आजच्या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये कोणत्या जोड्या नॉमिनेट होणार आणि कोणत्या विजयी हे बघणे रंजक असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 25, 2018 07:52 PM IST

ताज्या बातम्या