News18 Lokmat

ना ऐश्वर्या,ना माधुरी, 'केबीसी 9'चं सूत्रसंचालन करणार अमिताभ बच्चनच !

अमिताभ बच्चन यांनी शूटिंगसाठी फक्त 17 दिवस दिलेत. त्यात आॅगस्टचे 10 दिवस आणि सप्टेंबरचे 7 दिवस आहेत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 1, 2017 03:31 PM IST

ना ऐश्वर्या,ना माधुरी, 'केबीसी 9'चं सूत्रसंचालन करणार अमिताभ बच्चनच !

01 जून :  'कौन बनेगा करोडपती 9'चं सूत्रसंचालन कोण करणार याची चर्चा तुफान चालली. यावेळी स्त्री अँकर असणार म्हणून ऐश्वर्या आणि माधुरीच्या नावाची चर्चाही बरीच झाली. पण आता हे नक्की झालंय की या सीझनचं सूत्रसंचालन अमिताभ बच्चनच करणार. त्यामुळे बिग बींचे फॅन्स खूश झालेत.

'कौन बनेगा करोडपती'च्या नवव्या सीझनची तयारी सुरू झालीय. भव्य दिव्य सेटची उभारणी सुरू आहे. यावेळचं केबीसीचं श्येड्युल जाम टाइट आहे. कारण अमिताभ बच्चन यांनी शूटिंगसाठी फक्त 17 दिवस दिलेत. त्यात आॅगस्टचे 10 दिवस आणि सप्टेंबरचे 7 दिवस आहेत.

म्हणजे 17 दिवसांमध्ये 30 एपिसोड शूट करायचे आहेत. अर्थात, यावर काही ना काही इलाज काढला असणारच. या सर्वात लोकप्रिय शोला एकदा शाहरूख खान सूत्रसंचालक होता. पण त्यावेळी टीआरपी कमी झालेला. त्यामुळे बिग बींना पर्याय नाही, हेच खरं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 1, 2017 03:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...