केरळच्या पूरग्रस्तांसाठी बिग बी पुढे सरसावले

केरळमधील पूरग्रस्तांसाठी अमिताभ बच्चन यांनी देखील मदतीचा हात पुढे केलाय. 51 लाख रुपये आणि काही कपडे ज्यात 80 जॅकेट्स, 25 पॅण्ट्स, 20 शर्ट आणि काही स्कार्फचा समावेश आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 23, 2018 03:54 PM IST

केरळच्या पूरग्रस्तांसाठी बिग बी पुढे सरसावले

मुंबई, 23 आॅगस्ट : केरळमधील पूरग्रस्तांसाठी अमिताभ बच्चन यांनी देखील मदतीचा हात पुढे केलाय. 51 लाख रुपये आणि काही कपडे ज्यात 80 जॅकेट्स, 25 पॅण्ट्स, 20 शर्ट आणि काही स्कार्फचा समावेश आहे.केरळ मुख्यमंत्र्यांच्या डिस्ट्रेस रिलीफ फंडाला बिग बींनी ही मदत देऊ केलीय. ऑस्करविजेते साऊण्ड डिझायनर रसूल पुकुट्टी यांनी केरळच्या पूरग्रस्तांसाठी मदत करावी असं आवाहन सेलिब्रिटींसह सर्वांना केलंय. अनेक सेलिब्रिटी आता मदतीसाठी पुढे येत आहेत.

दरम्यान, रेहमान यांच्या कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या एका कॉन्सर्टदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतोय. संगीत हे सगळ्या वेदनांवर फुंकर घालण्याचं काम करतं त्यामुळे या कॉन्सर्टदरम्यान रेहमान यांनी त्यांच्या मुस्तफा मुस्तफा या गाण्याचे शब्द बदलून केरला केरला असे केले आणि त्यांच्या गाण्याला उपस्थित प्रेक्षकांनीही दाद दिलीय. या गाण्याद्वारे आपण केरळमधील पूरग्रस्तांसोबत असल्याचं त्यांनी दाखवून दिल्याने हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय.

हेही वाचा

मुंबईचा प्रसिद्ध डान्सर अभिजीत शिंदेने गळफास लावून केली आत्महत्या

VIDEO - केरला केरला डोंट वरी केरला, रेहमानच्या सुरांनी दिला धीर

Loading...

रणबीरनं आलियासोबतच्या नात्याबद्दल नक्की काय सांगितलं?

केरळच्या नागरिकांना सध्या आर्थिक मदतीसोबतच मानसिक आधाराचीही गरज आहे. रेहमान यांनी आपल्या संगीताच्या माध्यमातून लोकांना तो आधार आणि ती प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला आहे. कॅलिफोर्नियातील एका कॉन्सर्टदरम्यानचा त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये ते 'मुस्तफा, मुस्तफा' या गाण्याचे बोल बदलून 'केरला, केरला डोंट वरी केरला' असं गाणं गायलं. रेहमानच्या या अनोख्या संदेशाचं कौतुक नेटकरी करत आहेत.

केरळमध्ये आता पावसाचा जोर कमी झालाय. त्यामुळे मदतकार्याला वेग आलाय. पण सगळ्यात मोठी समस्या आहे ती रोगराई पसरण्याची. ठिकठिकाणी साचलेले चिखलाचे ढिगारे उपसणं आणि लोकांची घरं राहण्यालायक करणं हे एक मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे. दूषित पाण्यामुळे होणारे रोग पसरू नयेत यासाठी ब्लिचिंग पावडर मुबलक प्रमाणात आवश्यक आहे. मदत छावण्यांमध्ये आवश्यक ती औषधं पुरवायला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ९० अत्यावश्यक औषधं केरळमध्ये पोहोचली आहेत. पण पुराचा तडाखा बसलेली घरं पूर्ववत करणं आणि रोगाचा संसंर्ग होण्यापासून रोखणं ही दोन मोठी आव्हानं आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2018 03:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...