अमिताभ बच्चनना 'या' खास व्यक्तीसोबत केबीसी खेळायला आवडेल!

अमिताभ बच्चनना 'या' खास व्यक्तीसोबत केबीसी खेळायला आवडेल!

या शोमध्ये अनेक सेलिब्रिटीजनी हजेरी लावलीय. शाहरूख खान, सलमान खान, अनिल कपूर, फराह खान, प्रियांका चोप्रा, करिना कपूर आणि घरातलं माणूस म्हणजे अभिषेक बच्चन अशी मोठी यादी आहे.

  • Share this:

मुंबई, 28 आॅगस्ट : अमिताभ बच्चन यांचा कौन बनेगा करोडपती 3 सप्टेंबरपासून सुरू होतोय. त्यानिमित्तानं बिग बींनी मीडियाशी संवाद साधला. 2000सालापासून केबीसी सुरू झालं. आणि गेली अठरा वर्ष हा शो प्रचंड लोकप्रिय आहे. अमिताभ बच्चन यांची जादू अजूनही तशीच आहे. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटीजनी हजेरी लावलीय. शाहरूख खान, सलमान खान, अनिल कपूर, फराह खान, प्रियांका चोप्रा, करिना कपूर, रणवीर सिंग, राणी मुखर्जी, कतरिना , माधुरी दीक्षित, काजोल, अजय देवगण आणि घरातलं माणूस म्हणजे अभिषेक बच्चन अशी मोठी यादी आहे. पण बिग बीना विचारलं की तुम्हाला कोणाबरोबर केबीसी खेळायला आवडेल?

तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं माहितीये? आराध्या बच्चन. हो, त्यांना आपल्या लाडक्या लेकीबरोबर केबीसी खेळायचंय. पुढे ते म्हणाले, आता घरी गेल्यावर मला आराध्याबरोबर केबीसी खेळावंच लागेल. आपलं जनरल नाॅलेज सर्वात कमी असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आजोबा अमिताभ आणि नात आराध्या यांचं एक वेगळं नातं आहे. यावेळचा थर्टी फर्स्टही त्यांनी आराध्याबरोबर साजरा केला होता. बिग बींनी आपल्या ब्लाॅगमध्ये थर्टी फर्स्ट कसं साजरं केलं ते सांगितलेलं. 'रविवार असल्यानं सगळं कुटुंब घरी एकत्र होतं. आम्ही माझं घरातलं सर्वात आवडतं डेस्टिनेशन म्हणजे घरातल्या अंगणात एकत्र बसलो होतो. जयानं डायनिंग टेबल सजवलं होतं. खूप छान पदार्थांची मेजवानी होती. नातवंडं बागडत होती. आराध्यानं तिचा टियारा बॅण्ड आजोबांना घातला. तिनं सगळ्यांना गिफ्ट्स दिली आणि ती लगेच उघडून त्यावर प्रतिक्रिया द्या सांगितलं.'

देवियो और सज्जनो, हा आवाज पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे. कौन बनेगा करोडपतीचा 10वा सिझन सुरू होणार आहे. वर्षानुवर्षे बिग बी अमिताभ बच्चन यांच्यामुळे केबीसी शो नव्या उंचीवर पोहचला आहे. बिग बींचा अनोखा अंदाज, शोमध्ये येणारे स्पर्धक, त्यांच्या बिग बींचा संवाद, शोमधून समोर येणाऱ्या विविध भावनिक गोष्टी यामुळे केबीसीने टीआरपीमध्ये अव्वल स्थान मिळवलं. केबीसीपुढे इतर रिअॅलिटी शोची जादू फिकी पडली.

First published: August 28, 2018, 5:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading