नागराज मंजुळेंच्या सिनेमात अमिताभ बच्चन

नागराज मंजुळेंच्या सिनेमात अमिताभ बच्चन

नागराज मंजुळेच्या आगामी हिंदी सिनेमात अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत दिसतील या चर्चेला उधाण आलंय.

  • Share this:

07 आॅगस्ट : सैराट या मराठी सिनेमाच्या दैदिप्यमान यशानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे आता बॉलिवूडच्या दिशेने पाऊल टाकत आहे. हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करताना त्याने थेट बिग बी अमिताभ बच्चन यांनाच पाचारण केल्याची चर्चा आहे.

नागराज मंजुळेंच्या आगामी हिंदी सिनेमात अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत दिसतील या चर्चेला उधाण आलंय. सैराट हा सिनेमा मराठी प्रेक्षकांसह अमराठी प्रेक्षकांनीही पाहिला होता.सैराटच्या वादळानंतर आता नागराज मंजुळे कोणत्या विषयाकडे वळतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सैराट या मराठी सिनेमानं चित्रपट जगतात इतिहास निर्माण केला. आर्ची-परशा या व्यक्तिरेखा अजरामर झाल्या.  नागराजचे प्रत्येक सिनेमे हे हटके असतात. त्यामुळे अमिताभ नागराजच्या सिनेमात दिसण्याची शक्यता मोठी आहे. शिवाय बिग बी निगेटिव्ह भूमिकेत असतील,असंही म्हटलं जातंय.

First published: August 7, 2017, 11:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading