अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली, शूटिंग मध्येच थांबवलं

अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली, शूटिंग मध्येच थांबवलं

सूत्रांच्या माहितीनुसार शोच्या शेवटच्या एपिसोडचं शूटिंग करत असताना बिग बी अचानक आजारी पडले. शूटिंग करताना त्यांच्या गळ्याला तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यामुळे त्यांना काही खाणंही कठीण झालं होतं.

  • Share this:

23 आॅक्टोबर : अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' या लोकप्रिय क्विझ शो सोनी टीव्हीवर प्रसारित होतो. हा शो अंतिम टप्पात पोहोचला आहे. आज रात्री ( 23 आॅक्टोबर)  या शोचा शेवटचा भाग प्रसारित केला जाईल. या बातमीमुळे बीग बी आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये नाराजी आहे. पण या शेवटच्या भागासह अमिताभ यांच्या चाहत्यांसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. गेल्या आठवड्याच्या शूटिंगनंतर अमिताभ यांची प्रकृती बिघडल्याची चर्चा आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार शोच्या शेवटच्या एपिसोडचं शूटिंग करत असताना बिग बी अचानक आजारी पडले. शूटिंग करताना त्यांच्या गळ्याला तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यामुळे त्यांना काही खाणंही कठीण झालं होतं.इतकंच नाही तर त्यांना बोलतानाही प्रचंड त्रास होत होता. खरं तर शो बंद होणार यावर बिग बी खूप भावुक झाले होते. ते ट्विटरवर म्हणाले की 'शोचा शेवटचा दिवस असल्यामुळे खूप दु:ख आहे.'

माहितीनुसार, केबीसी सीजन-9 संपणार असल्यामुळे बिग बी म्हणाले की, हा शो इतकी वर्ष सफल झाला, कारण या शोसाठी 450 लोकांची टीम मोठ्या जोशाने आणि मेहनतीने काम करत आहे. त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्येही हे लिहिलं आहे. सहनशक्ती आणि चांगल्या कामासाठी केबीसीच्या टीमचे धन्यवाद. अमिताभ बच्चन यांनी 2000 सालापासून सुरू झालेल्या शोच्या सर्व प्रेक्षकांनाही धन्यवाद दिले. ते म्हणाले की 17 वर्षांपूर्वी या शोने इतिहास रचला होता आणि आपण असे करण्यास मदत केली, हे काही छोटं काम नव्हते.

आपल्या आजारपणाविषयी बिग बींनी लिहिलं की, 'मी आजारी पडल्यामुळे सगळे दु:खी झाले आहेत, पण आज आम्ही शेवटचं शूटिंग पूर्ण केली आहे. मागच्या महिन्यापासून मी केबीसीमध्ये सारखं बोलत असल्यामुळे माझ्या वोकल कॉर्डला जंतूसंसर्ग झाला आहे. त्यामुळे मला काही खाण्या-पिण्यासाठी त्रास होत आहे. औषधांच्या मदतीने मी हे शेवटचं शूटिंग पूर्ण करु शकलो आहे. '

First published: October 23, 2017, 9:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading