S M L

बिग बींनी आपल्या ब्लाॅगमध्ये तब्येतीबद्दल काय लिहिलंय?

त्यांना हा त्रास आधीच होत असल्याचं स्पष्ट झालंय, कारण त्यांनी खुद्द त्यांच्या ब्लॉगमधून तशी माहिती सकाळी पाचच्या सुमारास दिली होती.

Sonali Deshpande | Updated On: Mar 13, 2018 09:21 PM IST

बिग बींनी आपल्या ब्लाॅगमध्ये तब्येतीबद्दल काय लिहिलंय?

13 मार्च : थग्स ऑफ हिंदोस्तान या आगामी सिनेमाच्या सेटवर जोधपूरमध्ये शूट करत असताना बिग बी यांची तब्येत बिघडल्याचं समजतंय. त्यांना हा त्रास आधीच होत असल्याचं स्पष्ट झालंय, कारण त्यांनी खुद्द त्यांच्या ब्लॉगमधून तशी माहिती सकाळी पाचच्या सुमारास दिली होती.

या ब्लॉगमध्ये ते म्हणालेत -

"हो ...तर सकाळचे पाच वाजतायेत...रात्रीनंतरची सकाळ जी काल कामाने सुरू झाली...जगण्यासाठी काही माणसांना काम करावं लागतं...खूप मेहनत करावी लागते...

खूप कठीण आहे सगळं, पण सोप्या पद्धतीने कधी काही मिळालंय का कोणाला...संघर्ष आहे, निराशा आहे आणि त्रास आणि घाम आणि अश्रूही आहेत... आणि मग आपल्या अपेक्षा फळू लागतात... कधी कधी त्या काम करतात तर बहुतेक वेळा त्या निष्फळ ठरतात... ते उत्प्रेरक नसतं... जेव्हा नाही म्हटलं जातं तेव्हाच योग्य प्रेरणा मिळते ते योग्य बोलण्यासाठी आणि ती साकारण्यासाठी...

सातत्य, नियमितपणा, चिकाटी आणि चांगला स्वभाव हे सगळे गुण एका उत्तम 'गुरू'चे विविध अध्याय ठरतात...पण कधी कधी व्यावहारिकता मध्येच चुकते आणि अचानक सर्वोच्च ठरते... अनेक विजय ध्येयाच्या माध्यतूनच मिळवले गेले आहेत...अचानक...ज्याकडे कधी लक्ष नसतं तेच मध्येच ध्येय गाठतात...

आपण सगळेच तसे आहोत...खूप प्रमाणात...आणि त्याचा अभिमान आहे...

या रात्रीच्या अंधारात...अंधाराचं सौंदर्य आपली अभूतपूर्व आणि प्रेरणा देणारं भव्य रूप पसरू पाहतेय...कधीच कळू शकणार नाही, त्या भिंतींच्या आत काय घडलं...

काहीतरी गुपित असेल...बुद्धिमान जगात ज्ञानी असा एखादा मार्ग असेलच...जगात अक्षम्य असं काही नाहीये...सगळं आपणच तयार केलेलं आहे...

माझ्या डॉक्टरांच्या टीमला मी उद्या इथे माझ्या शरीराची तपासणी करण्यासाठी आणि मला पुन्हा बरं करण्यासाठी बोलावलं आहे... मी आराम करणार आहे आणि माझ्या तब्येतीबाबत तुम्हाला कळवत राहीन.''

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 13, 2018 09:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close