01 नोव्हेंबर : अमिताभ बच्चन यांनी नुकतीच वयाची 75 वर्ष पूर्ण केली. त्यांनी यावर्षी त्यांचा वाढदिवस साजरा केला नसला तरी त्यांच्या फॅन्सनी त्यांना एक सुंदर गिफ्ट दिलीय. बांद्राजवळ एका इमारतीची पूर्ण भिंत बिग बींना समर्पित केलीय.
बिग बींच्या 'दिवार' सिनेमाचं पोस्टर या इमारतीच्या भिंतीवर रंगवलंय. या आयकाॅनिक पेंटिंगच्या खाली लिहिलंय, ' बच्चन बेमिसाल पुरे 75 साल'. ही इमारत आहे 230 फूट उंचीची. अभिषेक कुमार आणि रजीत दहिया ही या फॅन्सची नावं आहेत. हे दोघं बिग बींचे फॅन्स आहेत.
या अद्भुत गिफ्टबद्दल बिग बी खूश आहेत. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर ही बातमी शेअर केलीय.
T 2697 - They build a 'DEEWAR' on a deewar .. in Bandra, Mumbai ..!!🙏🙏 pic.twitter.com/2YsS3zdXzj
Loading...— Amitabh Bachchan (@SrBachchan) 31 October 2017
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा