इफ्फीमध्ये अक्षयमुळे बिग बी झाले ओशाळवाणे, म्हणाले, अक्षय हे ठीक नाही!

इफ्फीमध्ये अक्षयमुळे बिग बी झाले ओशाळवाणे, म्हणाले, अक्षय हे ठीक नाही!

बिग बींनी ट्विट करून अक्कीला म्हटलंय, खूप ओशाळवाणं वाटलं मला. नाही अक्षय, असं होता कामा नये.

  • Share this:

29 नोव्हेंबर : गोव्यात रंगलेला इफ्फी संपला. यावेळचा इफ्फी वादविवादांमुळे चांगलाच गाजला. आणि शेवटच्या दिवशी एक वेगळंच नाट्य रंगलं. ते नाट्य रंगलं अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारमुळे.बिग बींनी ट्विट करून अक्कीला म्हटलंय, खूप ओशाळवाणं वाटलं मला. नाही अक्षय, असं होता कामा नये.

दचकलात ना? असं नक्की काय घडलं? झालं असं की या फेस्टिवलमध्ये अमिताभ बच्चनना इंडियन फिल्म पर्सनालिटी ऑफ द इयर पुरस्कारानं सन्मानित केलं. त्यावेळी स्टेजवर स्मृती इराणी आणि अक्षय कुमार यांच्या हस्ते बिग बींना अॅवार्ड दिलं गेलं. अक्षयनं बिग बींच्या पायांना हात लावून नमस्कार केला. ते अर्थातच विनम्र अमिताभना कसं रुचेल? म्हणून त्यांनी भावुक होऊन ट्विट केलं.

अक्षयनंही बिग बींच्या सन्मानार्थ छान ट्विट केलंय.

इफ्फीला अनेक रथी महारथी उपस्थित होते. अमिताभ बच्चन यांनी या सोहळ्याचं खूप कौतुक केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 29, 2017 02:52 PM IST

ताज्या बातम्या