अमित शहांच्या बाईक रॅलीमुळे बिग बी पाच तास वाहतूक कोंडीत अडकले

अमित शहांच्या बाईक रॅलीमुळे बिग बी पाच तास वाहतूक कोंडीत अडकले

अमित शहा मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. मुंबई विमानतळ ते वांद्रे बीकेसी मैदानापर्यंत बाईक रॅली काढण्यात आली होती.

  • Share this:

मुंबई, 06 एप्रिल : मुंबईत भाजपच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या बाईक रॅली प्रदर्शनामुळे मुंबईकरांना नाहक त्रास झाला. तसाच तो बॉलिवूडचा महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांनाही सहन करावा लागला.

अमित शहा मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. मुंबई विमानतळ ते वांद्रे बीकेसी मैदानापर्यंत बाईक रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमुळे वाहतूक कोंडी झाली होती. अमिताभ बच्चन यांनी फिल्मसिटीतून आपल्या एका शूटचं पॅक अप झाल्यावर घरी जाण्यास निघाले. फिल्मसिटी ते त्याचं घरं हे अंतर खरंतर अवघ्या अर्ध्या तासाचं आहे. पण काल त्यांना हेच अंतर पार करण्यासाठी तब्बल पाच तास लागले. स्वतः अमिताभ यांनीच या संबंधीचं ट्विट केलंय.

अमिताभ बच्चन यांची तब्येत सध्या फारशी चांगली नसल्यामुळे त्यांना आरामाची गरज असते. मात्र पाच तास कारमध्ये घालवल्याने त्यांना भाजप रॅलीमुळे ट्रफिक जामचा खूप त्रास सहन करावा लागला.

First published: April 6, 2018, 10:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading