'बोफोर्स', बाळासाहेब आणि बिग बी : पहा अमिताभ काय म्हणाले?

'बोफोर्स', बाळासाहेब आणि बिग बी : पहा अमिताभ काय म्हणाले?

बोफोर्सप्रकरणी बाळासाहेबच फक्त मागे उभे राहिले, आणि त्यांनी माझ्या खरेपणावर विश्वास ठेवला, असंही बिग बींनी सांगितलं.

  • Share this:

21 डिसेंबर : 'बाळासाहेब मला माझ्या पित्यासमान होते,' हे उद्गार आहेत बाॅलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांचे. संजय राऊत यांच्या 'ठाकरे' सिनेमाच्या टीझर लाँचवेळी ते बोलत होते. त्यांनी 40 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, ' माझं लग्न झाल्यावर बाळासाहेबांनी मला जयाला घेऊन मातोश्रीवर बोलावले होते. त्यावेळी माँसाहेबांनी जयाचं स्वागत असं केलं जणू त्यांची ती सूनच आहे.' बोफोर्सप्रकरणी बाळासाहेबच फक्त मागे उभे राहिले, आणि त्यांनी माझ्या खरेपणावर विश्वास ठेवला, असंही बिग बींनी सांगितलं.

यावेळी बिग बींनी संजय राऊत यांना सांगितलं की, बाळासाहेबांवरचा सिनेमा तीन तासात मर्यादित ठेवू नका. त्यावर वेबसीरिजच व्हायला हवी.

त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ' कुलीच्या वेळी मला बेशुद्ध अवस्थेत बंगलोरहून मुंबईला आणलं. खूप पाऊस होता. मला विमानतळाहून थेट हाॅस्पिटलला न्यायचं होतं. मुंबईत एकही अँब्युलन्स उपलब्ध नव्हती. फक्त बाळासाहेबांच्या शिवसेनेची अँब्युलन्स मदतीला आली. नाहीतर माझी अवस्था जास्त गंभीर झाली असती.'

ते म्हणाले, ' बाळासाहेबांच्या शेवटच्या दिवसांत मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. तेव्हा ज्या रुममध्ये बाळासाहेबांना ठेवण्यात आले होते. त्या रुममधील भिंतीवर माझा फोटो होतो. तो पाहून मी कृतज्ञ झालो.'

बिग बींनी संजय राऊत यांना सांगितलं, या सिनेमात माझं काहीही योगदान हवं असेल तर सांगा. मी द्यायला तयार आहे.'

First published: December 21, 2017, 9:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading