जेव्हा बिग बी पहाटे 4 वाजेपर्यंत गाणं रेकाॅर्ड करतात!

जेव्हा बिग बी पहाटे 4 वाजेपर्यंत गाणं रेकाॅर्ड करतात!

अमिताभ बच्चन यांना उगाचंच बाॅलिवूडचे शहेनशहा म्हणत नाहीत. आजही वयाच्या 75व्या वर्षी ते आपलं कुठलंही काम जीव ओतून करतात.

  • Share this:

25 जानेवारी : अमिताभ बच्चन यांना उगाचंच बाॅलिवूडचे शहेनशहा म्हणत नाहीत. आजही वयाच्या 75व्या वर्षी ते आपलं कुठलंही काम जीव ओतून करतात. म्हणूनच कुठेही यश त्यांच्या समोर हात जोडून उभंच असतं.

नुकतंच बिग बी एका लग्नाच्या रिसेप्शनला गेले होते. तिथून रात्री उशिरा ते स्वत:च्या आवाजातलं गाणं रेकाॅर्ड करायला म्युझिक स्टुडिओत गेले. तिथे पहाटे 4 वाजेपर्यंत ते गाणं रेकाॅर्ड करत होते. बिग बी आपल्या बऱ्याच गोष्टी फॅन्ससोबत शेअर करत असतात. ते लिहितात, ' रिसेप्शनला गेलो होतो. तिथे बनारस घाटासारखी सजावट केली होती. अगदी नवी आणि विलक्षण. तिथून रात्री गाणं रेकाॅर्ड करायला गेलो. ते पूर्ण करूनच आता शूटिंगला निघालोय.'

हे गाणं काय, कोणासाठी याचा त्यांनी काहीच उल्लेख केला नाही. पण त्यांनी गातानाचे वेगवेगळे एक्सप्रेशन्स ट्विट केलेत. त्यांनी लिहिलंय, ' पूर्ण गाणं एकाच आवाजात शूट झालं, ते बरं झालं.'

सध्या बिग बी आमिर खानच्या ठग्ज आॅफ हिंदोस्थानमध्ये काम करतायत.

First published: January 25, 2018, 1:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading