कसा केला बिग बींनी थर्टी फर्स्ट साजरा?

कसा केला बिग बींनी थर्टी फर्स्ट साजरा?

महानायक अमिताभ बच्चन यांनी न्यू इअर पार्टीचे खास फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. त्यात नात आराध्या आणि अमिताभ बच्चन दोघंही एकदम कँडीड मूडमधे सेल्फी काढताना दिसताहेत.

  • Share this:

01 जानेवारी : Big फोटोमध्ये आराध्यानं त्यांना स्वतःचा टियारा क्राऊन घालून दिलाय आणि स्वतः एकदम खूश दिसते आहे. बिग बीसुद्धा हा क्षण एंजाॅय करतायत.

बिग बींनी आपल्या ब्लाॅगमध्ये थर्टी फर्स्ट कसं साजरं केलं ते सांगितलंय. 'रविवार असल्यानं सगळं कुटुंब घरी एकत्र होतं. आम्ही माझं घरातलं सर्वात आवडतं डेस्टिनेशन म्हणजे घरातल्या अंगणात एकत्र बसलो होतो. जयानं डायनिंग टेबल सजवलं होतं. खूप छान पदार्थांची मेजवानी होती. नातवंडं बागडत होती. आराध्यानं तिचा टियारा बॅण्ड आजोबांना घातला. तिनं सगळ्यांना गिफ्ट्स दिली आणि ती लगेच उघडून त्यावर प्रतिक्रिया द्या सांगितलं.'

याआधी अमिताभ जलसाच्या समोर उभ्या असलेल्या चाहत्यांनाही भेटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 1, 2018 01:33 PM IST

ताज्या बातम्या