आषाढी एकादशीनिमित्त बिग बींनी केलं पांडुरंगाला अभिवादन

आषाढी एकादशीनिमित्त बिग बींनी केलं पांडुरंगाला अभिवादन

आज आषाढी एकादशी. पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपुरी वारकऱ्यांची मांदियाळी असते. पण या पांडुरंगाला अभिवादन केलंय बाॅलिवूडच्या शहनशहानं.

  • Share this:

मुंबई, 23 जुलै : आज आषाढी एकादशी. पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपुरी वारकऱ्यांची मांदियाळी असते. पण या पांडुरंगाला अभिवादन केलंय बाॅलिवूडच्या शहनशहानं. अमिताभ बच्चन यांनी. त्यांनी दोन ट्विटस् केलेत. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय,

भक्तीच्या वाटेवर गांव तुझे लागले, आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले, तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे, पांडुरंगा माझ्या माणसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे,  राम कृष्ण हरी

तर दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणतात,

टाळ वाजे, मृदुंग वाजे वाजे हरीचा विणा || माऊली निघाले पंढरपूरा मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला || ||जय जय राम कृष्ण हरी|| आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा…!

अमिताभ बच्चन नेहमीच ट्विटरवर व्यक्त होत असतात. आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर ते भाष्य करत असतात. विठ्ठलाला ट्विटरवर केलेलं अभिवादन पाहून त्यांचे फॅन्स नक्कीच खूश झालेत.

First published: July 23, 2018, 12:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading