इरफान खानचा 'ब्लॅकमेल' पाहून बिग बी भारावले!

इरफान खानचा 'ब्लॅकमेल' पाहून बिग बी भारावले!

इथे ब्लॅकमेल सिनेमाचं खास स्क्रीनिंग झालं. त्याला बाॅलिवूडच्या इतर हस्तींसोबत बाॅलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चनही उपस्थित होते.

  • Share this:

02 एप्रिल : येत्या शुक्रवारी इरफान खानचा ब्लॅकमेल सिनेमा रिलीज होतोय. इरफान सध्या लंडनला आपल्या आजारावर उपचार घेतोय. इथे ब्लॅकमेल सिनेमाचं खास स्क्रीनिंग झालं. त्याला बाॅलिवूडच्या इतर हस्तींसोबत बाॅलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चनही उपस्थित होते.

त्यांना सिनेमा खूप आवडला. त्यानंतर त्यांनी ट्विटही केलं. ते म्हणाले, 'आज एक विनोदी सिनेमा पाहिला. या सिनेमाची पटकथा दमदार आहे. कहाणी वेगळी आहे. एडिटिंग आणि प्रेझेंटेशनही मस्त आहे. इरफानसहित इतर नव्या कलाकारांचा अभिनयही लाजवाब आहे. एक चांगला सृजनशील अनुभव आहे.'

अभिनेता इरफान खान सध्या न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर या आजाराने ग्रस्त असून लंडनमध्ये तो या आजाराच्या उपचारासाठी गेलाय. ब्लॅकमेलमध्ये कृति कुल्हारी, दिव्या दत्ता, अरुणोदय सिंह, ओमी वैद्य आणि अनुजा साठे यांच्या भूमिका आहेत.

 

First published: April 2, 2018, 2:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading