'मैं अब थक चुका हूं...', बिग बींनी घेतली निवृत्ती? KBC 12 च्या अखेरच्या दिवशी केली भावुक पोस्ट

'मैं अब थक चुका हूं...', बिग बींनी घेतली निवृत्ती? KBC 12 च्या अखेरच्या दिवशी केली भावुक पोस्ट

गेल्या 14 वर्षांपासून महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) बहुचर्चित कार्यक्रम Kaun Banega Crorepati होस्ट करतात.

  • Share this:

मुंबई, 14 जानेवारी :  बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती 12' (Kaun Banega Crorepati 12) या शोचं होस्टिंग करत होते. हा शो 3 जुलै 2000 पासून प्रसारित झाला होता. कार्यक्रमाचं स्वरूप आणि महत्वाचं म्हणजे होस्ट अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) असल्यामुळे या शो ला घराघरातून मोठी पसंती मिळाली. 20 वर्षात घराघरात पोचलेल्या या लोकप्रिय कार्यक्रमाला अमिताभ यांनी तब्ब्ल 14 वर्ष होस्ट केलं. पण आता अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये शोच्या शेवटच्या शूटिंगचा उल्लेख केला आहे.

सध्या अमिताभ बच्चन KBC चा 12वा सीझन होस्ट करतात. पण आता या शोला अलविदा करणार असल्याची बातमी खुद्द बिग बींनी  दिली आहे. नुकतंच त्यांनी या शोच्या शेवट्याच्या एपिसोडचं (Last Episode) शूटिंग पूर्ण केल्याचं, त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून सांगितलं आहे. अमिताभ कायमच त्यांच्या आयुष्यातील घडामोडींबद्दल  ब्लॉगच्या (Blog) माध्यमातून व्यक्त होताना दिसतात. अमिताभ यांनी ब्लॉगमध्ये त्यांच्या KBC च्या सेटवरील काही अनुभवही शेअर केले आहेत.

(वाचा - दूर हटों! अनुष्का, विराटने शेवटी पापाराझ्झींना केली विनंती)

यात अमिताभ सांगतात, 'शूटच्या शेवटच्या दिवशी निरोप देताना बाकी उरत ते म्हणजे फक्त  प्रेम आणि आपुलकी. या शोचा सुंदर प्रवास कधीही थांबू नये असंच वाटतं, पण पुढे जाणं हा सृष्टीचा नियम आहे. शोच्या शेवटच्या दिवशी शोचे सर्व सदस्य सेटवर एकत्र जमले. प्रत्येक क्रू आणि टिममधले सदस्य खूप काळजी घेणारे आणि मेहनती होते. KBC माझ्यासाठी कायमच विशेष असेल आणि  मला कायमच KBC साठी विशेष ओढ जाणवेल. 'कौन बनेगा करोडपती'चा हा प्रवास माझ्यासाठी कायम अविस्मरणीय असेल'. तसंच या ब्लॉगमध्ये अमिताभ यांनी उल्लेख केला आहे की, 'मी सर्वांपुढे दिलगीर व्यक्त करतो, पण मी आता थकलो आहे आणि निवृत्त झालो आहे.'

(वाचा - VIDEO: सुशांतच्या मृत्यूची चेष्टा उडवणाऱ्या कॉमेडियनला नेटकऱ्यांनी शिकवला धडा)

दरम्यान, बिग बींनी 2020 मध्ये कोरोनावर मात करुन, पुन्हा 'KBC 12' चं शूटिंग सुरू केलं होतं.

Published by: News18 Desk
First published: January 14, 2021, 3:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading