'आईचा पदर तो आईचाच, त्याला दुसऱ्या कशाची सर नाही', बिग बी झाले भावुक

'आईचा पदर तो आईचाच, त्याला दुसऱ्या कशाची सर नाही', बिग बी झाले भावुक

बिग बी अमिताभ बच्चन यांनी डोळ्याला होत असलेल्या त्रासावर डॉक्टरांनी सांगितलेल्या उपायानंतर आईची एक आठवण शेअर केली आहे.

  • Share this:

मुंबई, 14 जानेवारी : बिग बी अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रीय असतात. ते सतत काही ना काही त्यांच्या चाहत्यांशी शेअर करत असतात. या वयातही ते ब्लॉग लेखन, सोशल मीडियावर लहान लहान प्रसंग सांगत असतात. अधून मधून वडील हरीवंशराय बच्चन यांच्या कवितासुद्धा शेअर करतात. आता त्यांनी एक भावूक पोस्ट लिहिली आहे. डोळ्याला होणाऱ्या त्रासानंतर आलेली आईची आठवण त्यांनी शेअर केली आहे.

फेसबुक पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या डोळ्यात दिसणाऱ्या काळ्या डागाबद्दल माहिती दिली आहे. त्यात त्यांनी म्हटलं की, डोळ्यात एक काळा डाग दिसला. डॉक्टरांना तो दाखवल्यानंतर हे वयामुळे असल्याचं त्यांनी सांगितलं. यावर उपाय म्हणून डॉक्टरांनी सांगितलं की, लहानपणी जसं आई पदर थोडा गुंडाळून, त्यावर फूंकर मारून गरम करून डोळ्यावर लावायची तसे करा सर्व ठीक होईल.

डॉक्टरांनी सांगितलेल्या उपायनंतर आईची आठवण झालेले बिग बी भावुक झाले. ते म्हणाले की, आता आई तर नाही, लाइटच्या मदतीने रूमाल गरम करून डोळ्याला लावला. पण त्याने काही वाटलं नाही. आईचा पदर तो आईचा पदर असतो त्याला दुसऱ्या कशाची सर नाही.

अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवरसुद्धा अनेकांनी आईबद्दलच्या भावूक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटलं की, खरंच आई असती तर हा काळा डाग डोळ्यात नाही तर कपाळावर टिळा दिसला असता.

एके काळी बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री आता दिसते अशी, पाहा PHOTO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 14, 2020 10:46 AM IST

ताज्या बातम्या