• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Big B यांच्या सुरक्षेसाठी तैनात हेड कॉन्स्टेबलची बदली, 1.5 कोटी पगार मिळत असल्याची चर्चा

Big B यांच्या सुरक्षेसाठी तैनात हेड कॉन्स्टेबलची बदली, 1.5 कोटी पगार मिळत असल्याची चर्चा

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan Bodyguard) यांचे बॉडीगार्ड म्हणून काम पाहणाऱ्या हेड कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदेंबाबतही सध्या विशेष चर्चा सुरू आहे. त्यांना मिळणाऱ्या पगाराबाबत ही चर्चा सुरू आहे

 • Share this:
  मुंबई, 27 ऑगस्ट: बॉलिवूडमधील कलाकारांची जेवढी प्रसिद्धी असते तेवढाच त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील महत्त्वाचा असतो. या सुरक्षा रक्षकांवर महत्त्वाची जबाबदारी असल्याने अनेकदा ते देखील चर्चेत असतात. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan Bodyguard) यांचे बॉडीगार्ड म्हणून काम पाहणाऱ्या हेड कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदेंबाबतही सध्या विशेष चर्चा सुरू आहे. ते गेले अनेक वर्ष बच्चन यांचे बॉडीगार्ड म्हणून काम पाहतात. दरम्यान त्यांची पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांनी बदली केली आहे. त्यांच्यावर असा आरोप करण्यात आला आहे की अमिताभ बच्चन त्यांना वार्षिक 1.5 कोटी पगार देतात आणि ही माहिती मिळाल्यानंतर चौकशीचे आदेश देखील देण्यात आले आहेत. दैनिक भास्करने याबाबत वृत्त दिले आहे. शिंदे 2015 पासून अमिताभ यांच्यासाठी काम करत असून अशी देखील चर्चा आहे की त्यांनी स्वत:ची सुरक्षा एजन्सी सुरू केली आहे. पोलीस कमिशनर यांच्याकडे यासंदर्भात माहिती पोहोचल्यानंतर शिंदेची बदली आली आहे. अशी माहिती समोर आली आहे की एक पोलीस एकाच स्टेशनमध्ये चार वर्षांपेक्षा अधिक वेळ राहू शकणार नाही असा नियम नगराळे यांनी जारी केला होता. त्यांनी कमिशनर पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर हे फर्मान जारी केलं होतं. त्या नियमानुसार शिंदे यांची बदली डीबी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. हे वाचा-#UninstallHotstar का होतंय ट्विटरवर ट्रेंड? या सीरिजमुळे भडकले युजर्स दरम्यान मीडिया अहवालानुसार शिंदे यांना करण्यात येणाऱ्या पेमेंट संदर्भात अधिक माहितीसाठी अमिताभ बच्चन यांच्या अकाउंट डिपार्टमेंटकडे देखील विचारणा केली जाऊ शकते. शिंदे यांच्या सॅलरीबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे.  त्यांना साधारण 12 लाख रुपये महिना बच्चन यांच्याकडून तर सरकारी पगारही मिळतो, अशी माहिती समोर आली होती.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: