मुंबई, 28 डिसेंबर : हिंदी चित्रपटसृष्टीतील शहेनशाह अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच सक्रिय असतात. या वयातही त्यांच्यात एखाद्या तरुणाप्रमाणे शिकण्याची जिद्द आहे. बॉलिवूडमध्ये (Bollywood) गेल्या 5 दशकांपासून ते आपल्या अभिनयाने चाहत्यांचं मनोरंजन करत आहेत. अमिताभ यांनी नुकतीच आपल्या छंदाबाबत एक पोस्ट केली आहे. ते दररोज रात्री न विसरता हे काम करतात.
अमिताभ बच्चन ब्लॉगपासून (Amitabh Bachchan Blog) ते इन्स्टाग्रामपर्यंत (Amitabh Bachchan Instagram) सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून ते फॅन्सच्या संपर्कात असतात. त्यांनी आपल्या लेटेस्ट इन्स्टाग्राम पोस्टमध्ये आपल्या ब्लॉगवर तरुणपणातला एक फोटो ब्लॉगसह कोलाज केला आहे आणि त्याखाली एक सुंदर कॅप्शनदेखील लिहिली आहे.
कॅप्शनमध्ये बिग बी म्हणतात, "अजी हॉं हुजूर मै लिखता हूँ; मै रोज रात लिखता हूँ! ये लिखा था आज मैंने अपने ब्लॉग पे, कल लिखूंगा इसी जगह अपने सदुपयोग से. DAY 5062, प्रतिदिन, हो गया ये आत्मचिंतन, कुछ क्रंदन, सचेतन और कुछ अनुकथन; पर हाँ हुजूर, मैं लिखता हूँ, मै रोज रात लिखता हूँ!"
हे वाचा - शाहिदच्या चाहत्यांसाठी बॅड न्यूज, 'Jersey' रिलीजबाबत घेतला हा निर्णय
अमिताभ बच्चन हे जसे श्रेष्ठ कलाकार आहेत, तसेच लेखकदेखील (Writer) आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते त्यांचे विचार, चित्रपट आणि कौटुंबिक गोष्टींबाबत ब्लॉग लिहित आहेत. त्यांच्या ब्लॉगवरून तुम्हाला त्यांच्या लेखनाची कल्पना येऊ शकते. खरं तर शब्दांची जादू त्यांच्या रक्तातच आहे. त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन हे मोठे लेखक होते, ही गोष्ट सर्वश्रृत आहे.
View this post on Instagram
या पोस्टवर अमिताभ यांचे फॅन्स मजेदार कमेंट्स करत आहेत. बिग बी यांचं रात्री अशा प्रकारे सोशल मीडियावर सक्रिय राहणं आश्चर्यकारक असल्याचं फॅन्स म्हणतात. एका युझरने कमेंटमध्ये म्हटलं आहे, की सर, रात्रीचे 2.30 वाजले आहेत. या वेळीही तुम्ही सक्रिय आहात, ही खूप आश्चर्याची बाब आहे.
हे वाचा - Year Ender 2021 : वर्षभरात गूगलवर सर्वाधिक सर्च केलेले TOP 10 सिनेमे, पाहा लिस्ट
अमिताभ यांचा कौन बनेगा करोडपती सीझन 13 (Kaun Banega Crorepati Season 13) यापूर्वीच्या सीझन्सप्रमाणे हिट ठरला. 17 डिसेंबरला शेवटच्या एपिसोडचं प्रसारण झालं. त्यावेळी अमिताभ बच्चन खूप भावूक झाल्याचं दिसून आलं. बिग बी यांच्या आगामी चित्रपटांविषयी बोलायचं झालं, तर त्यात ब्रह्मास्त्र, मेडे, गुडबाय आणि द इंटर्न या चित्रपटांचा समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amitabh Bachchan, Bollywood, Entertainment