हिना खाननं दिल्या ईदच्या पारंपरिक शुभेच्छा

हिना खाननं दिल्या ईदच्या पारंपरिक शुभेच्छा

  • Share this:

मुंबई, 22 आॅगस्ट : कुठलाही सण असो, दिवाळी, होळी, ईद... बाॅलिवूड स्टार्स शुभेच्छा द्यायला सर्वात पुढे असतात. बाॅलिवूडमध्ये आपण नेहमी सर्वधर्मभाव बघत असतो. बिग बी, आमिर खान, अक्षय कुमार ट्विट्स करून सणांच्या शुभेच्छा देत असतात. बकरी ईदही बाॅलिवूडमध्ये जोरदार साजरी होते. अनेक सेलिब्रिटींनी ट्विट करून सगळ्यांना शुभेच्छा दिल्या.

मुल्क सिनेमात मुराद अली मोहम्मदची भूमिका साकारणाऱ्या ऋषी कपूर यांनी सिनेमाचा फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या.

Loading...

बाॅलिवूडच्या महानायकानं, बिग बींनी बकरी ईदचे अनेक फोटोज शेअर करून शांती आणि प्रेमाच्या शुभेच्छा दिल्या.

आमिर खाननंही ट्विट करून आपल्या चाहत्यांना ईद मुबारक म्हटलं.

अक्षय कुमारनं प्रेम आणि आनंद सगळीकडे पसरू दे, अशी इच्छा व्यक्त केलीय.

छोट्या पडद्यावरची अभिनेत्री हिना खाननं तर ईदसाठी खास तयारी केली होती. तिनं पारंपरिक पोशाख परिधान केला होता. हिरव्या रंगाच्या पोशाखातल्या हिनानं सगळ्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

VIDEO : श्रीनगरमध्ये फडकले पाकिस्तान आणि ISISचे झेंडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2018 03:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...