मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Sara Khan: TV शोमध्ये पहिलं लग्न, दोन महिन्यात घटस्फोट; मराठमोळ्या शंतनूसोबत दुसरं लग्न करणार सारा खान

Sara Khan: TV शोमध्ये पहिलं लग्न, दोन महिन्यात घटस्फोट; मराठमोळ्या शंतनूसोबत दुसरं लग्न करणार सारा खान

सारा खान

सारा खान

Bidaai Fame Sara Khan: 'बिदाई' या टीव्ही मालिकेमुळे साधनाच्या रुपात घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सारा खान होय. सारा गेल्या अनेक वर्षांपासून पडद्यावरुन गायब होती. दरम्यान आता सारा खान तिच्या कमबॅकमुळे चर्चेत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 2 फेब्रुवारी- 'बिदाई' या टीव्ही मालिकेमुळे साधनाच्या रुपात घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सारा खान होय. सारा गेल्या अनेक वर्षांपासून पडद्यावरुन गायब होती. दरम्यान आता सारा खान तिच्या कमबॅकमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री लवकरच '1990' या चित्रपटातून पुनरागमन करणारआहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शाहिद काझमी करत आहेत. या चित्रपटात सारासोबत अर्जुन मन्हास आणि मीर सरवर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. साराच्या व्यावसायिक आयुष्यानंतर आता तिच्या खाजगी आयुष्यासंबंधित एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अभिनेत्री बॉयफ्रेंड शंतनू राजेसोबत लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच वृत्त आहे.

सारा खानचा बॉयफ्रेंड हा एक मराठमोळा मुलगा आहे. शंतनू राजे असं त्याच नाव आहे. शंतनू राजे हा व्यवसायाने पायलट असून तो एका रेस्टॉरंटचा मालक आहे. सारा आणि शंतनू सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते दोघेही सतत एकमेकांसोबतचे रोमँटिक आणि मजेशीर व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतात. या दोघांच्या बॉन्डिंगच सर्वांनाच कौतुक वाटतं.

हे वाचा:Jasmin Bhasin: 'घाणेरडे प्रश्न विचारले, कपडे काढायला सांगितलं', 'बिग बॉस'फेम जस्मिन भसीनने सांगितलेलं 'त्या' दिग्दर्शकाचं सत्य

अनेकांना माहिती असेल, सारा खान दुस-यांदा वधू बनणार आहे. हे साराचं दुसरं लग्न आहे. यापूर्वी अभिनेत्रीने 2010 मध्ये 'बिग बॉस 4' च्या घरात स्पर्धक अभिनेता अली मर्चंटसोबत लग्न केलं होतं. त्याकाळात या लग्नाची प्रचंड चर्चा झाली होती. या दोघांचे चाहते त्यांच्या लग्नाने फारच खुश होते. परंतु हे लग्न फक्त दोन महिने टिकले. घरातून बाहेर पडल्यानंतर सारा-अली मर्चंटचा घटस्फोट झाला होता. त्यांनतर गेल्यावर्षी सारा खान 'लॉकअप' मध्ये सहभागी झाली होती. विशेष म्हणजे या शोमध्ये तिचा एक्स पती अलीसुद्धा होता. या शोमुळे ते दोघे पुन्हा चर्चेत आले होते.

View this post on Instagram

A post shared by Sara Khan (@ssarakhan)

ई टाईम्सच्या रिपोर्टनुसार, सारा खान जवळपास दोन वर्षांपासून शंतनू राजेला डेट करत आहे. तिला आता आपल्या नात्याला नवं नाव द्यायचं आहे म्हणूनच तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. शंतनूही सारासोबत प्रचंड खूश आहे. दरम्यान साराने पुन्हा प्रेमात पडण्याबद्दल आणि तिच्या वाईट भूतकाळानंतर आयुष्याला आणखी एक संधी देण्याबद्दल संवाद साधला.

तर दुसरीकडे आपल्या नात्याबाबत बोलताना शंतनू म्हणाला, 'आम्ही भूतकाळाबद्दल कधीच बोलत नाही. या वर्षात हे जोडपं लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. त्याचबरोबर या लग्नामुळे दोघांचे कुटुंबीयही खूप खूश असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

First published:

Tags: Entertainment, Tv actress