Home /News /entertainment /

B'day Special: कधीकाळी रेस्टॉरंटमध्ये गाणी म्हणायचा हा प्रसिद्ध YouTuber, आता दरमहा इन्कम पाहून चक्रावाल!

B'day Special: कधीकाळी रेस्टॉरंटमध्ये गाणी म्हणायचा हा प्रसिद्ध YouTuber, आता दरमहा इन्कम पाहून चक्रावाल!

आज भुवन एक सेलेब्रिटी म्हणून ओळखला जात असला तरी त्याचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. करिअरच्या सुरुवातीला त्याला खूपच संघर्ष करावा लागला असून, त्याच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाहू या.

मुंबई, 22 जानेवारी: कधी काळी एका रेस्टॉरंटमध्ये नोकरी करणारा भुवन बाम (Bhuvan Bam Birthday Special) हा आज एखाद्या सेलेब्रिटीपेक्षा कमी नाही. मूळच्या गुजरातच्या असलेल्या भुवनचा आज (22 जानेवारी) 28 वा वाढदिवस आहे. आज भुवन एक सेलेब्रिटी म्हणून ओळखला जात असला तरी त्याचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. करिअरच्या सुरुवातीला त्याला खूपच संघर्ष करावा लागला असून, त्याच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाहू या. भारतातल्या सर्वांत मोठ्या यू-ट्यूबर्सपैकी (YouTubers) एक असलेल्या भुवन बामचं फॅन फॉलोइंग खूपच मोठं आहे. तरुणांमध्ये तो खूप लोकप्रिय आहे. त्याने स्वतःच्या आयुष्यात बरेच चढ-उतार पाहिले . कोरोनाच्या काळातच त्याच्या आई-वडिलांचं निधन झालं. हा काळ त्याच्यासाठी खूपच खडतर ठरला. याशिवाय करिअरच्या सुरुवातीला त्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता. त्याचं काम त्याच्या आई-वडिलांना फारसं आवडलं नव्हतं; पण भुवनने नेहमीच स्वतःवर विश्वास ठेवला आणि स्वतःच्या बळावर नाव कमावलं. भुवनने सोशल मीडियावर व्यक्त होण्यासाठी मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा घेतला. सोशल मीडियासाठी कंटेट तयार करताना त्यामध्ये त्याने शिव्या, अश्लील मजकूर याचाही समावेश केला. त्यामुळे बराच गदारोळसुद्धा झाला. भुवनला अनेकांनी विरोध केला; पण त्याने या काळात संयम दाखवून शांत राहणं पसंत केलं. सतत काम करून नवीन पिढीला स्वतःशी जोडण्यास त्याने प्राधान्य दिलं. हे वाचा-VIDEO: इब्राहिमसोबत कारमध्ये दिसून आली पलक तिवारी, कॅमेरा पाहून लपवलं तोंड आज भुवन बामचे यू-ट्यूबवर 25.1 मिलियन सबस्क्रायबर्स असून, त्याच्या प्रत्येक व्हिडिओला करोडो व्ह्यूज मिळतात. ‘BB Ki Vines’ नावाने त्याने स्वतःचं यू-ट्यूब चॅनल सुरू केलं होतं. परंतु त्यामागे त्याचं कोणतंही विशेष नियोजन नव्हतं. तो त्याचा नवीन नेक्सस फोन बघत होता. त्या वेळी त्याच्या मनात हा विचार आला होता. स्वतःच्या चॅनेलवर त्याने अनेक व्हिडीओ प्रसिद्ध केले असून, ते तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.
View this post on Instagram

A post shared by Bhuvan Bam (@bhuvan.bam22)

गेल्यावर्षीच्या आकडेवारीनुसार भुवन बामची नेटवर्थ 22 कोटी रुपये आहे. मीडिया अहवालानुसार, दरमहा तो 95 लाख कमावतो, ज्यात स्पॉन्सरशिपचाही समावेश आहे. techtofacts.com च्या रिपोर्टनुसार तो विविध ब्रँड्सच्या स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून हे कोट्यवधी रुपये कमावतो. हे वाचा-जुईलीच्या हातावर चढला रोहितच्या प्रेमाचा रंग!मेहंदीचा झक्कास VIDEO VIRAL एका रेस्टॉरंटमध्ये भुवनने गायक म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्याच्या आई-वडिलांना हे काम फारसं आवडलं नव्हतं. भुवन गायक होण्याचं श्रेय त्याच्या वडिलांना देतो. कारण वडिलांनी आणलेल्या सीडीज ऐकूनच भुवनने गाणं सुरू केलं. यू-ट्यूबवर जेव्हा त्याच्या व्हिडीओजनी धुमाकूळ घातला, तेव्हा हळूहळू तो फुलटाइम यू-ट्यूबर म्हणूनच काम करू लागला. तरुणांमध्ये खूपच लोकप्रिय असणारा भुवन आज त्याचा 28वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने सोशल मीडियावर त्याच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
First published:

पुढील बातम्या