मुंबई, 2 एप्रिल- प्रसिद्ध
YouTuber भुवन बाम
(Bhuvan Bam) त्याच्या नवीन व्हिडिओमुळे अडचणीत आला आहे. भुवनने ज्याप्रकारे आपल्या व्हिडीओमध्ये पहाडी महिलांवर भाष्य केलं आहे. त्याबाबत आता राष्ट्रीय महिला आयोगाने
(NCW) ऍक्शन घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. तसेच महिला आयोगाने भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाला भुवनवर कारवाई करण्यास सांगितले आहे. व्हिडिओवरून झालेल्या वादावर महिला आयोगाच्या कारवाईनंतर भुवनने आता जाहीरपणे माफी मागितली आहे.
यूट्यूबर भुवन बामने अलीकडेच त्याच्या यूट्यूब चॅनल 'बीबी की वाइन्स' वर एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यांनतर तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. भुवनने 'ऑटोमॅटिक बाईक' या शीर्षकासह एक व्हिडीओ अपलोड केला होता. त्यामध्ये पहाडी महिलांवर अश्लील शेरेबाजी करण्यात आली आहे. हा व्हिडिओ यूट्यूबवर 12 मिलीयनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतरच अनेकांनी भुवनवर टीका केली होती. हे प्रकरण वाढत जाऊन राष्ट्रीय महिला आयोगापर्यंत पोहोचले आहे. त्यानंतर त्यांनी दिल्ली पोलिसांना कॉमेडियनविरोधात एफआयआर नोंदवण्याची विनंती केली होती.
भुवन बामने मागितली माफी-
राष्ट्रीय महिला आयोगाच्या पोस्टनंतर भुवनने माफी मागितली आहे. त्याने लिहिलंय, 'माझ्या व्हिडिओच्या त्या भागामुळे काही लोकांचं मन दुखावल्याची माहिती मला मिळाली आहे. मी व्हिडिओ एडिट करून तो भाग काढून टाकला आहे. जे मला ओळखतात त्यांनाही माहीत आहे की मी महिलांचा किती आदर करतो. या व्हिडीओद्वारे कुणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मी सर्वांची माफी मागतो'.असं म्हणत भुवन बामने जाहीर माफी मागितली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.