‘टी सीरिज’च्या मालकाचं अक्षयच्या पावलावर पाऊल, कोरोनाग्रस्तांसाठी दान केली मोठी रक्कम

‘टी सीरिज’च्या मालकाचं अक्षयच्या पावलावर पाऊल, कोरोनाग्रस्तांसाठी दान केली मोठी रक्कम

म्युझिक कंपनी टी सीरिजच्या मालकानंही अक्षयच्या पावलावर पाऊल ठेवत मोठी रक्कम कोरोनाग्रस्तांसाठी दान केली आहे.

  • Share this:

मुंबई, 29 मार्च : कोरोना व्हायरसनं आतापर्यंत भारतात 1 हजारचा आकडा पार केला आहे. हा व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी पंतप्रधान मोदींनी देशभरात 21 दिवसांचं लॉकडाऊन केलं आहे. यासोबतच पंतप्रधानांनी देशवासियांना या संकटकाळात गरीब आणि मजूरांच्या मदतीसाठी अपील केलं आहे. ज्याला अनेक सेलिब्रेटी मोठा प्रतिसाद दिला. यामध्ये अभिनेता अक्षय कुमारचं योगदान खूप मोठं आहे. त्यानं 25 कोटी रुपये पीएम केअर फंडमध्ये दान केले. त्यानंतर आता म्युझिक कंपनी टी सीरिजच्या मालकानंही अक्षयच्या पावलावर पाऊल ठेवत मोठी रक्कम दान केली आहे.

टी सीरिजचे मालक भूषण कुमार यांनी पीएम रिलीफ फंडमध्ये 11 कोटी रुपये दान केले आहे. याची माहिती त्यांनी ट्विटरवरुन दिली. त्यांनी लिहिलं, 'आज आपण सर्वजण एका कठीण काळातून जात आहोत. या काळात एकमेकांची मदत करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी मी आणि टी सीरिजनं पंतप्रधान मदत निधीमध्ये 11 कोटी रुपये दान करत आहोत. आपण सर्व एकत्र येऊन याच्याशी लढू शकतो. जय हिंद!'

ट्विंकल खन्नाला Coronavirus ची लागण? बायकोसह हॉस्पिटलमध्ये पोहोचला अक्षय कुमार

पीएम रिलीज फंडसोबतच भूषण कुमार यांनी महाराष्ट्र सीएम फंडमध्येही 1 कोटी रुपये दान केले आहेत. याची माहिती सुद्धा त्यांनी त्यांच्या ट्विटरवरुन दिली. भूषण कुमार यांच्या आधी अभिनेता अक्षय कुमारनं 25 कोटी पीएम रिलीफ फंडमध्ये दान केले आहेत. याशिवाय अभिनेता वरुण धवननं 30 लाख रुपयांची रक्कम दान केली आहे.

कोरोनाग्रस्तांसाठी अभिनेत्री झाली नर्स, अभिनय सोडून करतेय रुग्णांची सेवा

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून जनतेला पीएम केअर्स फंड बद्दल माहिती दिली होती आणि यामध्ये मदत करण्याचं अपील केलं होतं. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, हा फंड कोरोना व्हायरसमुळे ओढवलेल्या या परिस्थितीमध्ये गरजूंपर्यंत मदत पोहोचवणारा दुवा होईल.

‘खरंच 25 कोटी दान करणार आहेस का?’ अक्षय कुमारचं उत्तर ऐकून वाटेल अभिमान

First published: March 29, 2020, 3:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading