प्रियांका चोप्राच्या पतीवर ‘ही’ अभिनेत्री फिदा, व्यक्त केली डेट करण्याची इच्छा

प्रियांका चोप्राच्या पतीवर ‘ही’ अभिनेत्री फिदा, व्यक्त केली डेट करण्याची इच्छा

प्रियांका चोप्राचा पती निक जोनसवर त्याच्या फॅन्सच नाही तर बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रीही फिदा आहेत.

  • Share this:

मुंबई, 07 डिसेंबर : अभिनेत्री प्रियांका चोप्रा हे सध्या बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमधील सुद्धा मोठं नाव आहे. प्रियांकानं मागच्या वर्षी 1 डिसेंबरला अमेरिकन गायक निक जोनसशी लग्न केलं. निकचं प्रियांकावर किती प्रेम आहे हे तर त्याच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्टमध्ये दिसतं. तसंच निकवर त्याचे अनेक चाहते फिदा आहेत. इतकंच नाही तर बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रीही त्याच्यावर फिदा आहेत. यापैकी एक म्हणजे भूमि पेडणेकर. भूमिनं याचा खुलासा एका मुलाखतीत केला होता. इतकंच नाही तर तिनं निक जोनसला डेट करण्याची इच्छा बोलून दाखवली.

करण जोहरचा शो कॉफी विथ करणच्या 6 व्या सीझनमध्ये भूमिनं अभिनेता राजकुमार रावसोबत हजेरी लावली होती. यातील क्विज सेशनमध्ये करणनं भूमिला विचारल जर तुला संधी मइळाली तर तू कोणाच्या पतीला किंवा बॉयफ्रेंडला डेट करशील? यावर भूमिनं लगेच उत्तर दिलं प्रियांका चोप्रा. ती पुढे म्हणाली, मी त्याची गाणी ऐकत मोठी झाले. तो खूप मोठा स्टार आहे आणि मला वाटतं तो खूप क्यूट आहे.

कल्की कोचलिननं केलं बेबी बंप फोटोशूट, पाहा PHOTO

 

View this post on Instagram

 

Just like chocolate 🍫 . . . #goodmorning #love #chocolate #wednesday #hello #insta #fam

A post shared by Bhumi✨ (@bhumipednekar) on

भूमिनं दिलेलं हे उत्तर अर्थातच गंमतीचा भाग होता. मात्र यावर प्रियांकाची प्रतिक्रिया काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. निक-प्रियांकानं नुकताच त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. यावेळी या दोघांनीही त्यांच्या लग्नाचे थ्रोबॅक फोटो शेअर करत एकमेकांवरील प्रेम व्यक्त केलं होतं.

बॉलिवूडमध्ये येण्याआधी अभिनेत्री करायची बेबी सीटरचं काम, बदलले होते डायपर्स

भूमिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर तिचा ‘पति पत्नी और वो’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. इतकंच नाही तर पहिल्या दिवशीच या सिनेमानं अर्जुन कपूर आणि कृती सेनन स्टारर ‘पानीपत’ सिनेमालाही मागे टाकलं. या सिनेमात भूमि पेडणेकर आणि कार्तिक आर्यन पती-पत्नी आहेत. तर अनन्या पांडे ‘वो’च्या भूमिकेत आहे.

स्लिम दिसायचंय? मग फॉलो करा करिनाचा Diet Plan, एक आठवड्यात दिसेल फरक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2019 03:44 PM IST

ताज्या बातम्या