‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’मध्ये झळकणार मराठमोळा अभिनेता, राणा दग्गुबातीला केलं रिप्लेस

‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’मध्ये झळकणार मराठमोळा अभिनेता, राणा दग्गुबातीला केलं रिप्लेस

बॉलिवूड सिनेमामधील मराठमोळे कलाकार प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.

  • Share this:

मुंबई, 15 जानेवारी : सध्या मराठी अभिनेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत. मराठी सिनेमांसोबतच हे कलाकार सध्या बॉलिवूडच्या सिनेमांमध्येही झळकताना दिसत आहे. तसेच बॉलिवूड सिनेमामधील त्यांच्या भूमिका सुद्धा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. मागच्या काही काळात रिलीज झालेले राझी, सिंबा, बाजीराव-मस्तानी सारखे सिनेमा असोत किंवा मग नुकताच रिलीज झालेला तान्हाजी सिनेमा. या सर्वच सिनेमात मराठमोळ्या कलाकारांनी आपापल्या भूमिका चोख बजावत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. त्यानंतर आता असाच एक नावाजलेला मराठमोळा अभिनेता ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ या सिनेमात दिसणार आहे.

‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ या सिनेमात दिसणारा मराठमोळा अभिनेता आहे शरद केळकर. सध्या ‘तान्हाजी’ सिनेमामुळे शरद चांगलाच चर्चेत आहे. ‘तान्हाजी’ या सिनेमामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका साकारल्यानंतर तो आता ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटामध्ये महत्त्वापूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमात अभिनेता राणा दग्गुबातीच्या जागी शरद केळकरला घेण्यात आल्याचं बोललं जात आहे.

'सलमान खान'ने भाचीला घेतलं कुशीत,अर्पिताने शेअर केला PHOTO

View this post on Instagram

happy new year to all #newday #newyear #newdecade #newprojects #newgoals #newambitions #sk #happynewyear #thankyou2019

A post shared by Sharad Kelkar (@sharadkelkar) on

सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार राणा दग्गुबातीची प्रकृती ठिक नसल्यानं त्यानं या सिनेमातून माघार घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी निर्मात्यांनी शरद केळकरचं नाव फायनल केल्याची चर्चा आहे. शरद केळकरनं बऱ्याच मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय बाहुबली सिनेमाच्या दोन्ही भागांच्या हिंदी व्हर्जनसाठी त्यानं आवाज दिला होता. त्यामुळे त्याचा चाहता वर्गही मोठा आहे. मात्र ‘तान्हाजी’ या सिनेमात त्यानं साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता ‘भुज’ सिनेमाच्या माध्यामातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं बोललं जात आहे.

लग्न न करताच अभिनेत्री झाली आई, आता व्यक्त केली चूक सुधारण्याची इच्छा

View this post on Instagram

एखाद्या कलाकरासाठी छत्रपति शिवाजी महाराजांच्या पेहरावात त्यांची देहबोली साकारण्याऐवढी भाग्याची आणि पवित्र गोष्ट कुठलीच नाही.... हर हर महादेव... Chhatrapati Shivaji Maharaj - Patthar se thokar toh sab khate hain, patthar ko thokhar maare woh Maratha! #TanhajiTheUnsungWarrior, in cinemas 10th January 2020. #TanhajiTrailerOnNov19 @ajaydevgn @kajol #SaifAliKhan @omraut @sharadkelkar @bhushankumar #AjayDevgnFFilms @tseries.official @tseriesfilms @tanhajifilm #KrishanKumar

A post shared by Sharad Kelkar (@sharadkelkar) on

तान्हाजी या चित्रपटानंतर अजय देवगण आणि शरद केळकर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. भुज हा एक अ‍ॅक्शनपट असणार आहे. दरम्यान राणा दग्गुबातीची प्रकृती पूर्ण स्थिर होण्यासाठी फार काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे त्याला या सिनेमाचं शूट करणं शक्य होणार नसल्याचं निर्मात्यांनी स्पष्ट केलं.

View this post on Instagram

ultimate happiness happy #daughtersday #kesha #daughtersarethebest #cutie #lifeline #happydaughtersday

A post shared by Sharad Kelkar (@sharadkelkar) on

राणानं या सिनेमातून एक्झिट केल्यानं निर्मात्यांनी या सिनेमासाठी शरद केळकरला विचारणा केल्याचं समजतं. अभिषेक दुधैया हे भुज सिनेमाचे दिग्दर्शक आहे. या चित्रपटामध्ये सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, परिणीती चोप्रा आणि एम्मी विर्क हे सर्व कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाती निर्मिती भूषण कुमार, वजिर सिंग, गिन्नू खनूजा, कृष्ण कुमार आणि अभिषेक दुधैया हे करत आहेत.

Bigg Boss 13 : शहनाझ गिलनं केली लिप KISS ची मागणी, सिद्धार्थ शुक्लानं...

Published by: Megha Jethe
First published: January 15, 2020, 5:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading