Bhool Bhulaiyaa 2 First Look : पोस्टरवरून या हिरोला ओळखणंही झालं कठीण!

या सिनेमाचं फर्स्ट पोस्टर नुकतंच लॉन्च करण्यात आलं असून यावर दिसत असलेल्या या अभिनेत्याला ओळखणंही काठीण झालं आहे. पाहा तुम्हाला ओळखता येतो का?

News18 Lokmat | Updated On: Aug 19, 2019 12:05 PM IST

Bhool Bhulaiyaa 2 First Look : पोस्टरवरून या हिरोला ओळखणंही झालं कठीण!

मुंबई, 19 ऑगस्ट : अक्षय कुमार आणि विद्या बालन यांचा सिनेमा ‘भूल भुलैय्या’ एका मल्याळम सिनेमाचा हिंदी रिमेक होता. 2007 मध्ये रिलीज झालेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरला होता. त्यानंतर बऱ्याच काळापासून या सिनेमाच्या सिक्वेल तयार करण्याची चर्चा सुरू होती. मात्र त्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नव्हती. पण आता या ‘भूल भुलैय्या 2’ची वाट पाहणाऱ्यासाठी एक खूशखबर आहे. या सिनेमाचा सस्पेन्स संपला असून या सिनेमासाठी आता कार्तिक आर्यनचं नावं फायनल करण्यात आलं आहे. या सिनेमाचं फर्स्ट पोस्टर नुकतंच लॉन्च करण्यात आलं असून यावर अक्षय कुमार बनलेल्या कार्तिक आर्यनला ओळखणंही कठीण झालं आहे.

‘भूल भुलैय्या 2’मधील कार्तिक आर्यनचा फर्स्ट लुक समोर आला असून यात कार्तिक हुबेहूब अक्षय कुमारच्या स्टाइलमध्ये दिसत आहे. कार्तिक पिवळ्या रंगाच्या धोती आणि कुर्त्यामध्ये दिसत असून त्यावर त्यानं रुद्राक्ष माळा आणि ब्रेसलेट घातलं आहे. तसेच डोक्यावर पिवळ्या रंगाचा कपडा बांधला आहे. या लुकमध्ये कार्तिक तसाच दिसत आहे. जसा ‘भूल भुलैय्या’मध्ये अक्षय कुमार दिसत होता. या पोस्टरमध्ये कार्तिक एका काउचवर बसलेला दिसत आहे. तर दुसऱ्या एका पोस्टरमध्ये त्याच्या चहूबाजूनी स्केलेटन दिसत आहे.

Loading...

‘भूल भुलैय्या 2’चा पहिला लुक प्रोड्यूसर भूषण कुमार आणि मुराद खेतानी यांनी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला. या सिनेमाचं दिग्दर्शन अनीस बज्मी करत आहेत. या सिनेमचं पोस्टर रिलीज करताना, ‘13 वर्षांनंतर... द हॉन्टिंग कॉमेडी रिटर्न्स’ असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या पोस्टरवर तरी कार्तिकच्या लुकमध्ये जास्त बदल करण्यात आला नसला तरीही रुपेरी पडद्यावर कार्तिक अक्षय सारखी जादू दाखवणार का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

=======================================================

Zomato महिला कर्मचाऱ्याची पोलिसांवर दादागिरी, शिवीगाळ केल्याचा VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 19, 2019 11:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...