बापरे! इतक्या कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे भोजपुरी सुपरस्टार रवी किशन

बापरे! इतक्या कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे भोजपुरी सुपरस्टार रवी किशन

रवी यांना महागड्या गाड्या विकत घेण्याची हौस आहे. त्यांच्याकडे एकाहून एक सरस अशा महागड्या गाड्या आहेत.

  • Share this:

मुंबई. 14 मे- फक्त भोजपुरीच नाही तर संपूर्ण भारतात रवी किशन हे नाव ओळखीचं आहे. रवी यांनी भोजपुरीप्रमाणेच हिंदी आणि अन्य भाषेतही सिनेमे केले. अथक मेहनतीने त्यांनी स्वतःचा असा चाहता वर्ग तयार केला आहे. अभिनयासोबतच यंदा ते उत्तर प्रदेश मधील गोरखपुरमधून भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढवत आहेत.

रवी यांना महागड्या गाड्या विकत घेण्याची हौस आहे. त्यांच्याकडे एकाहून एक सरस अशा महागड्या गाड्या आहेत. रवी किशन आणि त्यांच्या कुटुंबाकडे एकूण २१ कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. तसेच त्यांच्याकडे मर्सिडीज बेंज, बीएमडब्ल्यू आणि जग्वार यांसारख्या लग्झरी गाड्याही आहेत.

धोनीच्या आकंठ प्रेमात होती 'ही' साऊथची हॉट मॉडेल, असं तुटलं नातं

अखेर 10 महिन्यांनंतर 'या' अभिनेत्रीने दिला मुलाला जन्म

काही दिवसांपूर्वी नामांकनावेळी त्यांनी आपल्या संपतीची संपूर्ण माहिती दिली. या शपथ पत्रानुसार, रवी किशन यांच्याकडे २ कोटी ७० लाख, पत्नी प्रिती यांच्याकडे ८ लाख ५८ हजार, आश्रितच्या नावे १ लाख ३७ हजार आणि पूर्ण कुटुंबाच्या नावे २ लाख ९३ हजार रुपये आहे.

तसेच रवी किशन यांच्याकडे १२ कोटी ८४ लाख, पत्नी प्रिती यांच्याकडे ५ कोटी १६ लाख रुपयांची जंगम संपत्तनी आहे. रिपोर्ट्सनुसार रवी यांच्यावर १ कोटी ७७ लाखांचे कर्जही आहे.

तब्बल 12 वर्षांनंतर ब्रेकअपवर बोलला शाहिद, ‘तिच्यासोबतच्या ब्रेकअपनंतर आयुष्य ब्लॅक अँड व्हाइटसारखं झालं होतं.’

 

View this post on Instagram

 

Missing you both so much...love you'll the most..#MaaPapa❤️ #MissingYou #MySuperMan #MyLadyLove #BlessedDaughter #MyHappiness ❤️

A post shared by Riva Kishan (@itsrivakishan) on

शाहरुख खानसोबत काम केलेल्या या सहा अभिनेत्रींचा झालाय मृत्यू, एकीचं वय तर होतं फक्त 22 वर्ष

रवी यांच्या सिनेकरिअरबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी भोजपुरी आणि बॉलिवूडप्रमाणे हॉलिवूडमध्येही काम केलं आहे. ज्या सिनेमात रवी किशन असणार तो सिनेमा हिट होणारच अशी काहीशी भोजपुरी सिनेसृष्टीत त्यांची ख्याती आहे. एवढंच काय तर रवी किशन यांना भोजपुरी सिनेसृष्टीचे अमिताभ बच्चन असंही म्हटलं जातं.

घटस्फोटानंतर 'ही' टीव्ही अभिनेत्री एकटी सांभाळतेय मुलीला

SPECIAL REPORT: तापसी आणि भूमीचं अनोखं मदर्स डे सेलिब्रेशन

First published: May 14, 2019, 3:59 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading