VIDEO : याड लावलं! तब्बल 15 कोटी वेळा पाहिलं गेलंय प्रियांकाचं सुपरहॉट आयटम सॉन्ग

VIDEO : याड लावलं! तब्बल 15 कोटी वेळा पाहिलं गेलंय प्रियांकाचं सुपरहॉट आयटम सॉन्ग

प्रियांकाचं हे गाणं सध्या सोशल मीडियावर एवढं व्हायरल झालं आहे की आतापर्यंत तब्बल 15.27 कोटी पेक्षा जास्त लोकांनी हे आयटम सॉन्ग पाहिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 29 जानेवारी : बॉलिवूड सिनेमांप्रमाणेच भोजपुरी सिनेमा आणि गाण्यांचे असंख्य चाहते आहेत. अनेकदा भोजपुरी अल्बम सॉन्गचे व्हिडीओ रिलीज झाल्यावर लगेचच व्हायरल होताना दिसतात. असंच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात भोजपुरी अभिनेत्री प्रियांका सिंहनं काम केलं आहे. प्रियांकाचं पागल बनाइबे हे गाणं सध्या सोशल मीडियावर एवढं व्हायरल होत आहे की आतापर्यंत तब्बल 15.27 कोटी पेक्षा जास्त लोकांनी हे आयटम सॉन्ग पाहिलं आहे.

युट्यूबवर व्हायरल झालेलं हे गाणं खेसारी लाल यादव आणि प्रियांका सिंह यांच्या दबंग सरकार या सिनेमातील आहे. या सिनेमातील सर्वच गाणी खूप लोकप्रिय झाली आहेत पण या सिनेमातील प्रियांका सिंहवर चित्रित झालेलं ‘पागल बनाइबे’ हे गाणं विशेष गाजलं. हा सिनेमा रिलीज होऊन बराच काळ झाला असला तरीही हे गाणं मात्र अद्याप पाहिलं जातंय.

रात्रीस खेळ चाले ‘छेडछाडीचा’! अण्णा शेवंताचे फोटो पाठवणाऱ्या होमगार्डला बेड्या!

भोजपुरी सिनेमांच्या स्टार्ससोबतच भोजपुरी गाण्यांचाही वेगळा चाहता वर्ग आहे. ही गाणी बराच काळ लोकप्रिय राहतात. खेसारी लालाचं आणखी एक गाणं सध्या युट्यूबवर गाजत आहे. ‘मेहंदी लगा के रखना’ या भोजपुरी सिनेमातील गाणं ‘लगा के फेयर अँड लव्हली’ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हे गाणं भोजपुरी अभिनेत्री ऋतु सिंहवर चित्रित करण्यात आलं आहे.

'आता काय दाखवायचं राहिलंय?' प्रियांकाचा ग्रॅमी लुक सोशल मीडियावर झाला ट्रोल

लता दीदींच्या हातातलं बाळ आहे बॉलिवूडमधील मोठ्या घराण्याचा वारस; ओळखता येईल का?

First published: January 29, 2020, 8:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading