अश्लील कमेंट्स करणाऱ्याविरोधात अभिनेत्रीने दाखल केली FIR, मुंबई पोलिसांचे मानले आभार

अश्लील कमेंट्स करणाऱ्याविरोधात अभिनेत्रीने दाखल केली FIR, मुंबई पोलिसांचे मानले आभार

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री राणी चॅटर्जीने एक इसम तिला वारंवार सोशल मीडियावर त्रास देत असल्याने ती डिप्रेशनमध्ये आल्याचे सांगितले होते.

  • Share this:

मुंबई, 07 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे (Sushant Singh Rajput) मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर बॉलिवूडमधील अनेक प्रश्नांवर सोशल मीडियावर चर्चा होत आहे. त्याच्या जाण्यामुळे त्याचे चाहते अजूनही धक्क्यातून सावरले नाही आहेत. यादरम्यान प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री राणी चटर्जी ( Rani Chatterjee) देखील चर्चेचा विषय बनली होती. तिने फेसबुकवर आत्महत्या करण्याबाबत पोस्ट शेअर केली होती. दरम्यान एक इसम तिला वारंवार सोशल मीडियावर त्रास देत असल्याने ती डिप्रेशनमध्ये आल्याचे तिने या पोस्टमध्ये म्हटले होते. याप्रकरणी तिने आता आणखी एक पोस्ट केली आहे.

(हे वाचा-सुशांतच्या आत्महत्येनंतर ट्रोलिंगमुळे करण जोहर पूर्णपणे खचला, मित्राचा खुलासा)

राणीने या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, 'मुंबई पोलीस तुमचे खूप धन्यवाद. FIR दाखल केली आहे आणी मी लढत राहीन.' या पोस्टमध्ये तिने स्पष्ट लिहिले आहे की, अशाप्रकारे वाईट भाषा ती सहन करणार नाही. राणीला याबाबत तिच्या चाहत्यांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.

View this post on Instagram

🙏🙏🙏🙏🙏🙏

A post shared by Rani Chatterjee Official (@ranichatterjeeofficial) on

तर काही दिवसांपूर्वी अभिनेत्री राणी चटर्जीने फेसबुकवर एका माणसासंबधित स्क्रीनशॉट शेअर केला होता आणि त्याबरोबर तिने लिहिले आहे की, हा माणून तिला गेल्या अनेक काळापासून त्रास देत आहे. हा इसम तिला शिव्या देत असल्याचंंही तिने यावेळी नमूद केले होतं. त्याचप्रमाणे अभद्र भाषा वापरत असल्याची तक्रार राणीने केली होता. राणीने असे म्हटले आहे की, 'जेव्हा काही लोकं तिला या माणसाने लिहिलेल्या पोस्टचा स्क्रीनशॉट पाठवतात तेव्हा मला खूप दु:ख होते आणि त्यावेळी नैराश्य येते.' या इसमामुळे दीर्घकाळापासून आपण नैराश्याचा सामना करत असल्याचे राणीने म्हटले होते.

त्यावेळी राणीने मुंबई पोलिसांकडे मदत मागितली होती. 'मदत न मिळाल्यास मी आत्महत्या करेन कारण आता मी थकले आहे', अशा शब्दात राणीने फेसबुकवर तिची व्यथा मांडली होती. मात्र आता त्या इसमाविरोधात FIR दाखल झाल्यानंतर तिने मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.

संपादन - जान्हवी भाटकर

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 7, 2020, 4:49 PM IST

ताज्या बातम्या